MPSC Advertisement MPSC Recruitment for vacancies in Public Health Department of Govt of Maharashtra  
एज्युकेशन जॉब्स

MPSC Recruitment : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागात 'मेगा भरती'; जाणून घ्या कुठल्या पदांसाठी किती जागा?

सकाळ डिजिटल टीम

MPSC Recruitment : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. लोकसेवा आयोगाने नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील विविध पदांसाठीच्या भरतीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिराती वेगवेगळ्या संवर्गासाठी प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. आयोगाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

नेमके आरोग्य विभागातील कोणत्या संवर्गासाठी किती जागा आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आयोगाने दिली आहे. ज्या पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध केली आहे, त्याची यादी पुढीलप्रमाणे..

  • महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य विमा सेवा, गट-ब संवर्गाची 15 पदे

  • कान, नाक घसा तज्ञ (Senior E.N.T. Surgeon) विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाची 2 पदे

  • मनोविकार तज्ञ (Senior Psychiatrist) विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाचे 1 पद

  • शरीरविकृती शास्त्रज्ञ (Senior Pathologist) विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाची 3 पदे

  • बधिरीकरण शास्त्रज्ञ (Senior Anesthetist) विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाची 5 पदे

  • क्ष-किरण शास्त्रज्ञ (Senior Radiologist) विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाची 3 पदे

  • नेत्ररोग तज्ञ, (Senior Ophthalmologist) विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाची 5 पदे

  • बालरोग तज्ञ (Senior Paediatrician) विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाची 5 पदे

  • स्त्रीरोग व प्रसुती शास्त्रज्ञ (Senior Obstetrician and Gynaecologist)विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाची 7 पदे

  • अस्थिव्यंग शल्यचिकित्सक (Senior Orthopaedic Surgeon), विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाची 5 पदे

  • शल्यचिकित्सक (Senior Surgeon) विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाच्या 8 पदे

  • भिषक (Senior Physician), विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाच्या 8 पदे

वरिल पदासाठीच्या जाहीराती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे संकेतस्थळ https://mpsc.gov.in/ वर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT