MPSC announced today history of Maharashtra included group-B and group-C main examination education  esakal
एज्युकेशन जॉब्स

MPSC : स्पर्धा परीक्षेत अखेर ‘महाराष्ट्राचा इतिहास’

१५ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमातून महाराष्ट्राचा इतिहास वगळण्यात आला होता.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाच्या अराजपत्रित गट -ब व गट -क च्या मुख्य परीक्षेत पुन्हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा समावेश करण्यात आल्याची घोषणा राज्य लोकसेवा आयोगाने आज केली. १५ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमातून महाराष्ट्राचा इतिहास वगळण्यात आला होता. महाराष्ट्रात शाहू, फुले, डॉ. आंबेडकरांच्या सोबत आगरकर, र. धो. कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील आदी महापुरुषांचा इतिहास राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीसाठी होता.

मात्र हा इतिहास १४ नोव्हेंबरच्या नव्या अभ्यासक्रमातून वगळला आणि त्याचे राज्यभरात पडसाद उमटले. आज राज्य लोकसेवा आयोगाने याबाबत सुधारणा करत पुन्हा ‘महाराष्ट्राचा इतिहास’ मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे.

१५ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या नवीन अभ्यासक्रमानंतर अनेक परीक्षार्थींनी आयोगाकडे नाराजी अन तक्रारी नोंदवली. या परीक्षार्थींना न्याय मिळावा या हेतुने ‘महाराष्ट्राचा इतिहास’ अभ्यासक्रमात समाविष्ट करत आहोत.

- किशोरराजे निंबाळकर, अध्यक्ष, राज्य लोकसेवा आयोग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pachod News : पोळ्याच्या आनंदावर दुष्काळाचे विरजण..! बैलांना आंघोळ घालायलाही नाही पाणी

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी चार युवक पाण्याच्या टाकीवर; सरकारच्या भूमिकेविरोधात संताप

Pune Crime : पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून पत्नीने संपविले जीवन

त्यांच्या मिसेस आमच्यासाठी चहा घेऊन आल्या... सचिन तेंडुलकरांच्या पाहुणचाराने भारावलेला निलेश साबळे; म्हणाला- जेव्हा ते आले...

SCROLL FOR NEXT