MPSC Exam sakal
एज्युकेशन जॉब्स

MPSC Exam : एमपीएससीने एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यात, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा तसेच समाज कल्याण अधिकारी (गट-ब) आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी (गट-ब) या सरळसेवा चाळणी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलल्या जातील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु त्याबाबत कोणतीही घोषणा आयोगाकडून आतापर्यंत करण्यात आलेली नव्हती. आता मात्र आरक्षणाचे कारण पुढे करत राज्य लोकसेवा आयोगाने एप्रिल आणि मेमध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. याबाबतची माहिती आयोगाने गुरुवारी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

त्यानुसार, २८ एप्रिल रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, तसेच १९ मे रोजी होणारी समाज कल्याण अधिकारी (गट-ब) आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी (गट-ब) या सरळसेवा चाळणी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता अधिनियम २०२४ मधील आरक्षणाच्या तरतुदी विचारात घेता, राज्य सरकारकडून सुधारित आरक्षण निश्चिती प्राप्त झाल्यानंतर एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या परीक्षांच्या बाबतीत पुढील घोषणा करण्यात येतील, असे आयोगाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT