mpsc exam sakal
एज्युकेशन जॉब्स

MPSC Exam : संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलल्या

राज्य लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२० या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

राज्य लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२० या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

मुंबई - राज्य लोकसेवा आयोगाकडून (MPSC exam) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२० या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात (Postpond) आल्या आहेत. आयोजनासंदर्भातील पुढील निर्णय घेण्यात येणार असून त्यानंतर या परीक्षेच्या सुधारित तारखा निश्चित करण्यात येतील. तोपर्यंत या परीक्षेच्या आयोजनासंदर्भातील सर्व प्रक्रिया स्थगित करण्यात येत असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

आयोगाकडून या परीक्षा २९, ३० जानेवारी, २०२२ तसेच ५ फेब्रुवारी आणि १२ फेब्रुवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या परीक्षांचे आयोजन आणि तयारी यासाठी कालावधी कमी पडणार असल्याचे कारण देत आयोगाने त्या पुढे ढकलल्या आहेत.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट संयुक्त पूर्व परीक्षा २०२० च्या दिनांक २५ नोव्हेंबर, २०२९ रोजी प्रसिध्द उत्तरतालिकेसंदर्भात काही विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल रिट केली होती, त्यावर उच्च न्यायालयाने २४ जानेवारी, २०२२ रोजी दिलेल्या आदेशानुसार याचिकाकर्त्या ८६ उमेदवारांना दिनांक २९ व ३० जानेवारी, २०२२ राजो आयोजित परीक्षेसाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात प्रवेश देऊन नियोजित दिनांकास परीक्षेचे आयोजन करण्याच्या अनुषंगाने आयोगाच्या कार्यालयाकडून सदर ८६ उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था तातडीने करण्यात आली होती.

मात्र, उच्च न्यायालयाच्या दिनांक २४ जानेवारी, २०२२ रोजीच्या आदेशाच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, नागपूर आणि महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद येथे ८६ उमेदवारांव्यतिरिक्त काही अतिरिक्त उमेदवारांना तात्पुरत्या स्वरुपात परीक्षेस प्रवेश देण्याचे निर्देश दिले असल्याने या सर्व विद्यार्थ्याच्या परीक्षेच्या तयारीसाठी आयोगाने या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

आयोगाकडून उत्तरपत्रिका व प्रश्नपुस्तिकांची छपाई करण्यात येते. त्यात पूर्वनिश्चित संख्येपेक्षा खूप जास्त उमेदवारांना प्रवेश द्यावा लागणार असल्याने आयोगाकडून छपाई करण्यात आलेल्या प्रश्नपुस्तिका व उत्तरपत्रिकाच्या आधारे परीक्षा आयोजित करणे तसेच परीक्षेच्या आयोजनासंदर्भातील इतराही संबंधित बाबींची व्यवस्था करणे अल्पकालावधीत शक्य होणार नसल्याचे सांगत आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT