mpsc exam esakal
एज्युकेशन जॉब्स

MPSC Exam : एकाच दिवशी तीन भरती परीक्षा; वेळापत्रकात बदल करण्याची उमेदवारांची मागणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सहायक पोलिस निरीक्षक पदाची परीक्षा आणि नगरपरिषदेची परीक्षा एकाच दिवशी म्हणजे सोमवारी (ता.२९) आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सहायक पोलिस निरीक्षक पदाची परीक्षा आणि नगरपरिषदेची परीक्षा एकाच दिवशी म्हणजे सोमवारी (ता.२९) आली आहे. त्यात भर म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (महाज्योती) युपीएससी प्रवेश परीक्षाही त्याच दिवशी असून, वेळापत्रकात बदल करावा, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे कार्याध्यक्ष महेश घरबुडे सांगतात, ‘तिनही परीक्षा एकाच दिवशी आल्याने उमेदवार अडचणीत आले आहे. एमपीएससीने आधीच वेळापत्रक जाहीर केले होते. तर महाज्योतीने आता वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे महाज्योती संस्थेच्या अधिकाऱ्यांनी वेळापत्रकात थोडा बदल करावा, अशी मागणी उमेदवार करत आहे.’

वेळापत्रकात बदल केल्यास उमेदवारांवर अन्याय होणार नाही. तसेच गरजू उमेदवारांना महाज्योतीची परीक्षाही देता येईल. महाज्योतीच्या प्रवेश परीक्षेला बसणाऱ्या सर्वच उमेदवारांनी एमपीएससीच्या परीक्षेची गेल्या वर्षभरापासून तयारी केली आहे. तसेच आयोगाने आधिच वेळापत्रक घोषीत केल्याने महाज्योतीने परीक्षा त्याच दिवशी का ठेवली, असा प्रश्नही उमेदवार विचारत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT