MPSC Exam esakal
एज्युकेशन जॉब्स

MPSC Exam: राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर, विनायक पाटील राज्यातून प्रथम

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा २०२२ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. ही तात्पुरत्या स्वरुपाची यादी असून कागदपत्रे पडताळणीनंतर याचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. या तात्पुरत्या यादीत विनायक पाटील हा राज्यातून पहिला आहे.

एमपीएससीकडून आतापर्यंतची राज्यसेवेची सर्वात मोठी जाहिरात असलेल्या ६१३ पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. आजच (ता. १८) उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आणि आजच एमपीएससीने सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रकाशित केलेली आहे.

गुणवत्ता यादीत विनायक पाटील याने मुलांमध्ये प्रथम क्रमांक तर पूजा वंजारी हिने मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. आयोगाने घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आणि लांबत जाणारे निकाल यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. मात्र, मुलाखतीच्याच दिवशी निकाल जाहीर करत विद्यार्थ्यांना सुखद धक्का दिला आहे.

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ मध्ये विनायक नंदकुमार पाटील यांनी ६२२ गुण मिळवत अव्वल क्रमांक पटकावला आहे. धनंजय बांगर यांनी ६०८ गुण तर सौरभ गावंडे यांनी ६०६ गुण मिळवले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT