MPSC MPSC
एज्युकेशन जॉब्स

MPSC : तांत्रिक सेवा पूर्व परीक्षेच्या शुल्काचा भरणा करण्यास मुदतवाढ

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा २०२१ च्या परीक्षा शुल्काचा भरणा करण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. परीक्षा शुल्काचा भरणा केवळ ऑनलाइन पद्धतीने बुधवारपर्यंत (ता. २३) करता येईल.

महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा २०२१ साठी अर्ज सादर करण्यास १० मार्च २०२२ रोजीच्या शुध्दिपत्रकाद्वारे दिनांक १८ मार्च २०२२ व भारतीय स्टेट बँकेत चलनाद्वारे परीक्षा शुल्काचा भरणा करण्यास दिनांक २१ मार्च २०२२ रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. चलनाद्वारे परीक्षा (Exam) शुल्काचा भरणा (Fee) करण्याच्या अंतिम दिनांकास भारतीय स्टेट बँकेच्या प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे काही उमेदवारांना परीक्षा शुल्काचा भरणा करण्यात अडचणी निर्माण झाल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले आहे.

यामुळे परीक्षेसाठी केवळ ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्काचा भरणा करण्यास २३ मार्च २०२२ रोजी २३.५९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. चलनाची प्रत घेतली आहे; परंतु, बँकेत परीक्षा शुल्काचा भरणा करता आला नाही, अशा उमेदवारांकडील चलनाची वैधता समाप्त झाल्याने त्यांनाही केवळ ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्काचा भरणा करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT