MPSC News 
एज्युकेशन जॉब्स

MPSC News : कर सहाय्यकाच्या पात्रता यादीवर उमेदवारांचा आक्षेप; त्रुटींमुळे अपात्र उमेदवार कौशल्य चाचणीसाठी पात्र?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) नुकतेच महाराष्ट्र अराजपत्रित गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२३ कर सहाय्यक या पदाचा कौशल्य चाचणीसाठीचा निकाल प्रसिद्ध केला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य कर सहाय्यक पदासाठी घोषित झालेल्या टंकलेखन कौशल्य चाचणीच्या पात्रता यादीवर काही उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांचे टंकलेखन प्रमाणपत्र नसताना काही विद्यार्थ्यांना पात्र ठरविले आहे. तसेच लिपिक व टंकलेखकांसाठीचे नियम कर सहाय्यक पदासाठी गृहीत धरल्यामुळे अन्याय झाल्याची भावना काही उमेदवारांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) नुकतेच महाराष्ट्र अराजपत्रित गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२३ कर सहाय्यक या पदाचा कौशल्य चाचणीसाठीचा निकाल प्रसिद्ध केला. त्याबद्दल राजेश सांगतो, ‘‘कर सहायक टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र नसताना काही उमेदवार पात्र ठरविण्यात आले आहेत. कर सहाय्यक पदासाठी मराठी आणि इंग्रजी दोन्ही टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक आहेत. तरीही एक प्रमाणपत्र असलेल्यांना पात्र ठरविण्यात आले आहेत.तसेच एकही टंकलेखन प्रमाणपत्र नसणारे, प्रकल्पग्रस्त ,भूकंपग्रस्त ,पदवीधर, अंशकालीन उमेदवार, माजी सैनिक कर सहायक साठी पात्र केले गेले आहेत. पण हे आरक्षण लिपिक व टंकलेखकांसाठी आहे. ते कर सहाय्यक पदासाठी लागू नाही. म्हणून ते अपात्र असायला हवेत.’’

आयोगाने दोन्ही प्रमाणपत्र असलेले, पण कर सहायक पूर्व परीक्षा ज्या उमेदवारांनी पास केलेली नाही. ते देखील कौशल्यचाचणीसाठी पात्र ठरवले असल्याचा आरोपही उमेदवाराने केला. आयोगाने तातडीने त्रुटी दुरुस्त करत कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांची पुन्हा घोषणा करावी, असे आवाहन उमेदवारांनी केले आहे. तसेच यासंबंधीचा इमेल एमपीएससीला पाठविल्याचे उमेदवारांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गला गारपिटीचा तडाखा; कणकवली, वैभववाडीत आंबा-काजू पिकांचे मोठे नुकसान

Virat Kohli Tattoo: विराट कोहलीने हातावर गोंदवला 'कमळ'; काय आहे, नवीन टॅटूचा खास अर्थ?

Latest Marathi News Live Update : चैत्री एकादशीसाठी तयारी पूर्ण; दर्शन रांगेसाठी पत्राशेड, पंखे-कुलर आणि थंड पाण्याची व्यवस्था

निस्तेज त्वचा अन् डार्क सर्कल्स? महागड्या क्रीम्सऐवजी 'हे' 5 घरगुती उपाय ठरतील वरदान!

Maharashtra weather update : दक्षिण महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता; विदर्भात तापमान वाढीचा इशारा

SCROLL FOR NEXT