MPSC esakal
एज्युकेशन जॉब्स

MPSC: प्रवेशपत्रात गोंधळ, आयोगाकडून कार्यवाही तूर्तास स्थगित

सकाळ डिजिटल टीम

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2021 मधील संयुक्त पेपर 2 च्या प्रवेश प्रमाणपत्रासंदर्भात गोंधळ निर्माण झाला होता. 17 जुलै रोजी होणाऱ्या उपनिरिक्षक पेपर क्रमांक २ चे प्रवेश प्रमाणपत्र प्रसिद्ध करणे तूर्तास स्थगित करण्यात आले आहेत. उमेदवारांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

(MPSC Hall Ticket Update)

दरम्यान १७ जुलै २०२२ रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परिक्षा २०२१ पोलिस उपनिरिक्षक पेपर क्रमांक २ साठी प्रवेश प्रमाणपत्र प्रसिद्ध करण्यासाठी तांत्रिक कार्यवाही सुरू असताना उद्याच्या म्हणजेच ९ जुलै २०२२ रोजीच्या परिक्षेचे प्रमाणपत्र डाऊनलोड करणाऱ्या काही उमेदवारांना त्यांच्या खात्यात दोन वेगवेगळ्या उपकेंद्रांचे प्रवेश प्रमाणपत्र दाखवत आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. यासंदर्भात आयोगाने ही कार्यवाही तूर्तास स्थगित केली आहे.

या गोंधळामुळे सध्या उद्याच्या परिक्षेचे प्रवेश प्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यावर ठेवण्यात आले असून १७ जुलैच्या परिक्षेसाठीचे प्रवेशपत्राची कार्यवाही स्थगित करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांच्या प्रवेशपत्रासंदर्भात गोंधळ निर्माण झाला आहे अशा उमेदवारांच्या मेलवर प्रवेशपत्र पाठवण्याची सोय आयोगाकडून केली जाणार आहे. यासंदर्भातील माहिती आयोगाने प्रसिद्धीपत्रक काढून दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT