MPSC PSI Result 2023 esakal
एज्युकेशन जॉब्स

MPSC PSI Result : कष्टाचं चीज झालं; गवंड्याच्या पोराची पोलिस उपनिरीक्षकपदाला गवसणी

ज्ञानेश्वर (Dnyaneshwar Palange) लहानपणापासूनच हुशार आणि कष्टाळू मुलगा होता.

सकाळ डिजिटल टीम

आई-वडिलांनी माझ्यासाठी लहानपणी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवून अधिकारी होण्याचे स्वप्न मी पाहिले होते.

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची येथील अत्यंत गरीब कुटुंबातील सुपुत्र ज्ञानेश्वर शिवाजी पलंगे याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC PSI Result 2023) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२० परीक्षेत पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली.

ज्ञानेश्वर (Dnyaneshwar Palange) लहानपणापासूनच हुशार आणि कष्टाळू मुलगा होता. त्याचे प्राथमिक शिक्षण गुळवंची येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण सोलापूर येथील श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेत झाले. बारावी वाणिज्य शाखेतून हरिभाई देवकरण प्रशालेत झाले.

पंढरपूर येथील द. ह. कवठेकरमध्ये डी. एड्. पूर्ण केले. त्याचवेळी त्याने अधिकारी होण्याचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवले होते. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो मुंबई पोलिस दलात भरती झाला. तेवढ्यावरच न थांबता त्याने अभ्यासात सातत्य ठेवत एमपीएससी तयारी सुरू ठेवली.

शिक्षण घेत असताना त्याचे वडील गवंडी काम करून तर आईने कपडे शिवून त्याच्या शिक्षणाला मदत केली. त्यांच्या कष्टाची जाण ठेऊन सातत्याने अभ्यास करून आज ज्ञानेश्वरने पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. त्याचे यश पाहून आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. गुळवंचीसारख्या छोट्याशा गावातील गरीब कुटुंबातील तरुण पोलिस उपनिरीक्षक झाल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

आई-वडिलांनी माझ्यासाठी लहानपणी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवून अधिकारी होण्याचे स्वप्न मी पाहिले होते. ते सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवून लागेल ती मदत केल्याने आज त्यांच्या कष्टाचे चीज झाले. मित्रमंडळींनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याने माझे स्वप्न साकार होण्यास मदत झाली. जिद्द, मेहनत आणि चिकाटी असेल तर अशक्य काहीच नाही.

- ज्ञानेश्वर पलंगे, नूतन पोलिस उपनिरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder: 1 ऑक्टोबरपासून 'एलपीजी'बाबतच्या नियमांमध्ये मोठे बदल; 'या' ग्राहकांना मिळणार नाही लाभ

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरेंचा शेतात लाइट लावून शेतकऱ्यांशी संवाद

Dharashiv News : आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांनी धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा केला पाहणी दौरा; शेतकऱ्यांनी अत्यंत पोटतिडकीने आपल्या व्यथा मांडल्या

Police Commissioner Amitesh Kumar : ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई; वेळेपेक्षा भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य

Karad Ganpati Visarjan : कऱ्हाडच्या मिरवणुकीत दिसली बदलाची चाहूल; डीजेच्या दणदणाटापेक्षा वाद्यांचा गजर, गुलालएेवजी खुलला भक्तीचा रंग

SCROLL FOR NEXT