mpsc result sti exam result mpsc result latest news sti merit list rak94 
एज्युकेशन जॉब्स

MPSC Result News : STI परीक्षेची निकाल जाहीर, 'इथे' पाहा अंतिम गुणवत्ता यादी

सकाळ डिजिटल टीम

MPSC Result News : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२२ मधील राज्य कर निरीक्षक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. आयोगाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर ही यादी उमेदवारांना पाहाता येईल.

दरम्यान महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२२ पुढे ढकलण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. प्रशासकीय कारणामुळं ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचं MPSCनं स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा - आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

महाराष्ट्र दुय्यम सेवेअंतर्गत येणाऱ्या संयुक्त पेपर क्रमांक १, संयुक्त पेपर क्रमांक २ (पोलीस उपनिरीक्षक), संयुक्त पेपर क्रमांक २ ( राज्य कर निरीक्षक) तर पेपर क्रमांक २ (सहाय्यक कक्ष अधिकारी) आणि दुय्यम निबंधक, मुद्रांक निरीक्षक या मुख्य परीक्षा २०२२ पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यांपैकी पेपर १ ची परीक्षा २४ डिसेंबर २०२२, पोलीस उपनिरीक्षकाची (PSI) ३१ डिसेंबर, राज्य कर निरीक्षक (STI), सहाय्यक कक्ष अधिकारी (Assistant) १४ जानेवारी २०२३ रोजी या परीक्षा होणार होत्या. दरम्यान, या सर्व परीक्षांच्या नव्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील असं आयोगाकडून कळवण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्मानिय उद्धव ठाकरे म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT