MPSC
MPSC MPSC
एज्युकेशन जॉब्स

Notice For MPSC Candidates : गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेच्या सूचना प्रसिद्ध

सकाळ डिजिटल टीम

जा.क्र. २४९/२०२१ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ साठी उमेदवारांसाठी ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र दुय्यम सेवा (MPSC) अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ ही शनिवारी (ता. २६ फेब्रुवारी २०२२) रोजी होणार आहे. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या ऑनलाइन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.

परीक्षेसाठी विहित परीक्षा उपकेंद्रावर परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर हजर राहणे अनिवार्य आहे. परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रमाणपत्रावर विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश नाही. ओळखच्या पुराव्यासाठी आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत सादर करणे अनिवार्य आहे.

परीक्षा (Exzam) कक्षात मोबाईल (Mobile) अथवा इतर कोणतेही दूरसंचार साधन घेऊन जाण्यास परवानगी नाही. परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये मित्र, नातेवाइक, पालक अथवा अन्य अनधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश नाही. परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा. खाजगी वाहनांच्या पार्किंगसाठी परीक्षा उपकेंद्रावर कोणतीही व्यवस्था करण्यात येणार नाही.

प्रश्नपुस्तिका, उत्तरपत्रिका तसेच प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करून तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करणे अनिवार्य आहे. परीक्षा उपकेंद्रामध्ये प्रवेश करताना तसेच परीक्षा कालावधीमध्ये उमेदवाराने मास्क (Mask) परिधान करणे अनिवार्य आहे. तसेच परीक्षा कालावधीमध्ये उमेदवारांनी स्वतःचे सॅनिटायझर वापरणे आवश्यक राहील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT