डॉ. संदीप भाजीभाकरे 
एज्युकेशन जॉब्स

'अधिकाऱ्यांचे गाव'ची मुहूर्तमेढ! डॉ. संदीप भाजीभाकरेंची यशोगाथा

'अधिकाऱ्यांचे गाव'ची रोवली मुहूर्तमेढ! डॉ. संदीप भाजीभाकरेंची यशोगाथा

अक्षय गुंड - सकाळ वृत्तसेवा

मुंबईचे पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले डॉ. संदीप भाजीभाकरे यांची यशोगाथा.

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : अगदी पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपअधीक्षक (Deputy Superintendent of Police) पदाला गवसणी घातलेले आणि 'उपळाई बुद्रूक अधिकाऱ्यांचे गाव' म्हणून राज्याला ओळख निर्माण करण्यासाठी मुहूर्तमेढ रोवणारे, सध्या पदोन्नतीने मुंबईचे पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले डॉ. संदीप रामदास भाजीभाकरे (Dr. Sandeep Bhajibhakare) यांची यशोगाथा (Success Story) प्रेरणादायी अन्‌ अचंबित करून टाकणारी आहे.

डॉ. संदीप भाजीभाकरे यांचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत तर, माध्यमिक शिक्षण "रयत'च्या नंदिकेश्वर विद्यालयात झाले. अधिकारी होण्यासाठी या शाळांचा खूप मोठा वाटा आहे. शालेय स्पर्धा परीक्षांसाठी शिक्षक ए. डी. लोंढे, गणितासाठी ज्योतीराम गिड्डे व इंग्रजीसाठी अब्दुल पठाण यांचे मार्गदर्शन लाभले. घरची परिस्थिती तशी मध्यम स्वरूपाची होती. त्यांच्या आईचे (सुवर्णलता) शिक्षण नववी तर वडिलांचे मॅट्रिकपर्यंत झाले होते. वडील त्यांना लहानपणी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रेरणादायी यशोगाथा सांगायचे. डॉ. संदीप यांची पूर्वजांपासून असलेली जमीन कूळ कायद्याच्या एका खटल्यात अडकली होती. ती सोडवण्यासाठी त्यांच्या आजीने तिच्यापरीने पूर्ण प्रयत्न केले होते, पण न्याय मिळाला नाही. नंतर वडिलांनी त्यात लक्ष घातले, त्यामुळे मामलेदारांच्या कार्यालयात संदीप यांचे वडिलांसोबत येणे-जाणे होत असायचे. कित्येक वर्षांपासून हा खटला सुरू असल्याने, घरातील वातावरण बिघडायचे. त्यात वडिलांना होणारा त्रास, या सर्व गोष्टी जवळून पाहिल्याने अधिकाऱ्यांच्या कार्याची क्षमता त्या वेळी संदीप यांच्या लक्षात आली होती. हा आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट म्हटल्यास वावगे ठरणार नाही. भविष्यात आपणही अधिकारी होऊन जनतेची सेवा करण्याची मनोमन इच्छा त्यांच्यामध्ये निर्माण झाली. त्यामुळे स्पर्धा परीक्षा हेच अंतिम ध्येय ठेवून त्यांचे शिक्षण सुरू होते.

वालचंद कॉलेजमधून बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. गुणवत्तेच्या जोरावर कोणत्याही इंजिनिअरिंग कॉलेजला व मेडिकल शासकीय कॉलेजला मोफत प्रवेश मिळत होतारु पण त्यांचा शैक्षणिक दृष्टिकोन स्पष्ट होता. बीए किंवा बीएस्सी पूर्ण करून स्पर्धा परीक्षेची तयारी करायची, या मतावर ते ठाम होते. तसे आई-वडील आणि सर्व नातेवाइकांसमोर ते पटवून देखील देत होते. परंतु त्याकाळी मेडिकलला प्रवेश घ्यायचे म्हटले की, लाखो रुपयांचा शैक्षणिक खर्च व्हायचा. त्यामुळे इथे मोफत प्रवेश मिळतोय म्हटल्यावर का संधी नाकारतोय, असा सल्ला वडील आणि नातेवाइकांनी दिला. सर्वांच्या इच्छेनुसार एमबीबीएसला प्रवेश घेतला. पाच वर्षे शिक्षण उत्तमरीत्या पूर्ण केले. पण मनात स्पर्धा परीक्षेची आवड स्वस्थ बसू देत नव्हती.

पुणे येथे मेडिकलचे इंटर्नशिप सुरू असताना, पुन्हा ध्येयासाठी वाहून घेत जोमाने अभ्यास सुरू केला. काही विषय थोडे कच्चे असल्याने इतरांना विचारायला गेले की ते म्हणायचे, डॉक्‍टर तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय का? अन्‌ आम्ही तुम्हाला काय मार्गदर्शन करावे? असे उपरोधाने बोलायचे. पण संदीप जिद्द सोडणारे नव्हते. पुण्यातील जयकर ग्रंथालयात तासन्‌तास अभ्यासासाठी खर्ची घातला अन्‌ पहिल्याच पूर्व परीक्षेत यश संपादन केले. मुख्य परीक्षेसाठी कालावधी असल्याने वरकुटे (ता. माढा) येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले. येथे कार्यरत असतानाच दिलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आणि पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपअधीक्षक या पदावर त्यांची वर्णी लागली. सध्या पदोन्नतीने मुंबईत पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. करण्याची जिद्द असेल तर संधी कुठेही उपलब्ध होतात, फक्त करण्याची धमक पाहिजे, असे डॉ. संदीप भाजीभाकरे आवर्जून सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT