Mumbai-Thane Vertical University  Sakal
एज्युकेशन जॉब्स

Mumbai-Thane Vertical University : मुंबई, ठाण्यात आता व्हर्टिकल विद्यापीठ

राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून नवे निकष जाहीर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे महापालिका क्षेत्रात आता खासगी संस्था, कंपन्यांना स्वंयअर्थसाहाय्यित तत्त्वावर ‘व्हर्टिकल विद्यापीठ संकुल’ स्थापन करता येणार आहे. यासाठी किमान १५ हजार चौरसमीटर बांधकाम असणारी, स्वतंत्र असलेली इमारत आवश्‍यक आहे.

कोणत्याही संस्था आणि कंपन्यांना हे विद्यापीठ स्थापन करता येणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने याबाबतचे निकष आज जारी केले माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांच्या अध्यक्षतेखाली द्विसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती.

या समितीने मुंबई शहर जिल्ह्यात स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध नसेल तर, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन व तेलअविव या शहरांमध्ये उभारण्यात आलेल्या व्हर्टिकल विद्यापीठ संकुलाप्रमाणे आणि त्याच धर्तीवर मुंबई शहर जिल्ह्यामध्ये असे विद्यापीठ स्थापन करण्याची शिफारस केली होती. त्या पार्श्वभूमीवर विभागाने निकष जारी केले आहेत.

व्हर्टिकल विद्यापीठासाठीचे निकष

  • किमान १५ हजार चौरस मीटर बांधकाम असणारी स्वतंत्र इमारत

  • उपलब्ध जमीन व बांधकाम यांचे प्रमाण महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे तरतुदींनुसार हवे

  • सदर इमारतीमध्ये कोणताही व्यवसायिक भागधारक नसावा.

  • विद्यार्थी संख्या वाढल्यास वाढीव बांधकामासाठी वाव असावा.

  • वर्गखोल्या इतर सोयी-सुविधा अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे असाव्यात

  • नॅकची ३.२५ ग्रेड पॉइंट किंवा समकक्ष एनबीए किंवा एनआयआरएफ यामध्ये पहिल्या २०० मध्ये आलेले प्रायोजक मंडळ अर्ज करण्यास पात्र

  • जवळच्या परिसरात विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या वसतिगृहाची सोय असावी.

  • किमान ४० टक्के क्षेत्र खेळाच्या मैदानासाठी राखीव ठेवणे बंधनकारक राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर खेळवा, तो... रवी शास्त्री स्पष्ट इशारा; गावसकरांनी केलं मोठं भाष्य

Navi Mumbai News : पावसाच्या पाण्यात उतरला विद्युतप्रवाह, शॉक लागताच २ विद्यार्थीनी रस्त्यातच पडल्या; महापौर आणि MSEBचे एकमेकांकडे बोट

Fifa World Cup : हॅरी केनचा दुहेरी गोलांचा धमाका; इंग्लंडचा काँगोवर २-१ असा दमदार विजय

World Sports Journalists Day 2026: 2 जुलैलाच का साजरा केला जातो जागतिक 'क्रीडा पत्रकार दिन'? जाणून घ्या इतिहास

'बाल्कनीतून खाली उडी...' मंदार जाधवने सांगितला डिप्रेशनमधला थरकाप उडवणारा प्रसंग, म्हणाला 'काम नव्हतं म्हणून...'

SCROLL FOR NEXT