Murtuza Kachwala statement icai to make changes in ca syllabus education  sakal
एज्युकेशन जॉब्स

CA Syllabus : सीएचा अभ्यासक्रम बदलणार; मुर्तुझा काचवाला

काचवालांची माहिती; पुढील वर्षापासून प्रात्यक्षिकांवर भर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सीए अभ्यासक्रमात पुढील वर्षापासून बदल करण्यात येणार आहे. नवीन अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकांवर भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना दोन वर्षांची आर्टिकलशिप करावी लागणार आहे, अशी माहिती द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचे पश्चिम विभाग चेअरमन सीए मुर्तुझा काचवाला यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमांच्या बरोबरीने आपला अभ्यासक्रम असावा अशी रचना केली जाते आहे. नवीन अभ्यासक्रमाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला आहे. मंजुरी मिळताच ताे लागू केला जाईल. भारतीय राज्यघटनेवरील पेपर प्रथमच अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहेत. फाउंडेशन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे संधी मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना डिजिटल लर्निंग हबवर अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. आर्थिक ताळेबंद सीएच्या स्वाक्षरीखाली यूडीआयएम क्रमांक द्या, त्याची ऑफलाइन पडताळणी करता येते. यामुळे चुकीचे प्रकार टाळण्यात येतात. चुकीचे प्रकार करीत असलेल्या सदस्यांविरुद्ध कमिटीकडे तक्रार आल्यास सदस्याचे निलंबन, डिबार किंवा अर्थिक दंडाची कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. नोव्हेंबर महिन्यात मुंबईत वर्ल्ड काँग्रेस ऑफ अकाउंटंट आयोजित करण्यात आले होते. त्यात ११० देशातून विद्यार्थी, सीए उपस्थित होते. सीएच्या अभ्यासक्रमात पहिल्यांदाच संविधानाचा समावेश केला आहे, असेही काचवाला यांनी सांगितले. यावेळी पश्चिम विभागाचे सदस्य अभिजित केळकर, श्वेता जैन, नागपूर शाखेचे अध्यक्ष जीतेन सागलानी, सचिव अक्षय गुन्हाने, यशवंत कसार, पियुष चांडक, संजय अग्रवाल उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT