nagpur katol boy gunit gave answer every question quikly education Sakal
एज्युकेशन जॉब्स

प्रश्न फर्स्ट असो वा लास्ट, उत्तर देतो फास्ट!

दहाव्या वर्षीच काटोलच्या गुणितला जगभरातलं सगळंच तोंडपाठ

साक्षी राऊत

नागपूर (काटोल) : माहिती नसलेल्या प्रश्नाचं उत्तर लगेच हवं असल्यास पहिला पर्याय पुढे असतो तो म्हणजे गुगल. मात्र काटोलच्या गुणितला हॅलो गुणित म्हणत कुठलाही कठीण प्रश्न विचारला तरी सहज उत्तर मिळू शकतं.

अवघ्या दहा वर्षाच्या गुणितला जगातला अगदी सूर्यमालेसंदर्भात असो किंवा मग जगातील नद्या, महासागरे, भारतालगतचे देश आणि त्यांचं अंतर किती, असा कुठलाही कठीण प्रश्न विचारला की तो सेकंदात उत्तर देतो. त्याची चातुर्यबुद्धी अवाक करणारी आहे.

वयाच्या तिसऱ्या वर्षापासून गुणितचे वडील सतीश कावडकर यांनी त्याला विविध विषयांसंदर्भात शिकवायला सुरवात केली. तो पाच वर्षांचा असताना त्याला बरेच देश आणि त्यांच्या राजधान्या तोंडपाठ होत्या. आता तो दहा वर्षांचा आहे.

१९५ देशांची नावं तोंडपाठ फक्त २ मिनीट ३० सेकंदात सांगतो. गुणितचे वडील सतीश यांनी विविध पुस्तके आणि ऑनलाइन माहिती गोळा करत विविध विषयांच्या नोंदवह्या केल्या आणि त्याबाबत ते गुणितला शिकवू लागले.

गुणित हे सगळं चटकन शिकून घ्यायचा हे विशेष. डब्ल्यूएचओ सारख्या अनेक जागतिक संस्थांचे फुलफॉर्म आणि त्यांचे मुख्यालय कुठे, तेसुद्धा गुणित तोंडपाठ सांगतो. गुणितचे वडील हे शासकीय कंत्राटदार आहेत व आई प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे.

गुणितला शिकविण्यासाठीची वडिलांची धडपड

गुणितला जगभरातले देश नकाशावर दर्शविता यावे म्हणून त्यांनी दुकानात उपलब्ध नसलेल्या वर्ल्ड कोरा मॅपची प्रत अखेर गुगलवरून काढून घेत त्याचा सराव सुरू केला. गुणित दहा वर्षांचा असून त्याला जगातील सगळे देश शिवाय मान्यताप्राप्त नसलेले देशसुद्धा नकाशावर बिनचूक लिहिता येतात.

यूपीएससी अभ्यासक्रमातील नद्या, त्यांचे उगमस्थान, पर्वतरांगा, नद्यांची मूळ नावं तो अगदी सेकंदात अचूक सांगतो. शिवरायांच्या संपूर्ण कुटुंबीयांची माहिती आणि प्रत्येकाचा कार्यकाळ गुणित स्पष्टीकरणासहीत सांगतो. शिवाय ग्रहताऱ्यांवरही त्याचा विशेष अभ्यास आहे. सूर्यमालेतील ग्रहताऱ्यांचेही अंतर तो सांगतो.

मुलांना शिकवणी वर्ग नको, स्वत: वेळ द्या

गुणितला लहानपणापासून कुठलाही शिकवणी वर्ग नाही. वेळ मिळेल तसे रोज एक ते दोन तास देत मी त्याला शिकवत असतो. लहानपणापासून मी त्याचा असाच सराव घेत आलो आहे. मुलांना पालकांनी स्वत: थोडा वेळ देऊन गोष्टी शिकवल्यास ते उत्तम घडतात. त्यांचा आत्मविश्वास वाढतो, असे मत गुणितच्या वडिलांनी व्यक्त केले आहे.

हुशार गुणित मोठा होऊन काय बनणार?

गुणितला मोठं होऊन काय बनायचंय असं विचारल्यास तो शास्त्रज्ञ व्हायचंय असं सांगतो. वैज्ञानिक प्रयोग आणि त्यासंदर्भातील अभ्यासात त्याला विशेष रस असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकीला उपचारासाठी घेऊन आलेल्या बापाला महिला डॉक्टरनं मारली कानाखाली; सरकारी दवाखान्यातला VIDEO VIRAL

इलॉन मस्कने पुन्हा एकदा जगाला केलं शॉक! Wikipedia ला टक्कर देणार Grokipedia, कोणतं आहे बेस्ट? पाहा एका क्लिकवर

"तर आमची मैत्री तुटेल..." राज ठाकरेंसोबत सिनेमा बनवण्यावर महेश मांजरेकरांनी मांडलं मत; म्हणाले..

Latest Marathi News Live Update : र्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा पक्ष प्रवेश सोहळा

Hasan Mushrif : हसन मुश्रीफांचा सार्वजनिक बांधकाम विभागावर संताप, कामातील दिरंगाईवर अधिकाऱ्यांना खडे बोल

SCROLL FOR NEXT