Technical Education sakal
एज्युकेशन जॉब्स

National Single Window System : नवीन संस्थांना मान्यतेसाठी ‘राष्ट्रीय एक खिडकी प्रणाली’ कार्यन्वित

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने २०२३ -२४ या शैक्षणिक वर्षासाठी नवीन तंत्र शिक्षण संस्थांच्या मान्यतेसाठी ‘राष्ट्रीय एक खिडकी प्रणाली’ (नॅशनल सिंगल विंडो सिस्टिम) कार्यन्वित केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने २०२३ -२४ या शैक्षणिक वर्षासाठी नवीन तंत्र शिक्षण संस्थांच्या मान्यतेसाठी ‘राष्ट्रीय एक खिडकी प्रणाली’ (नॅशनल सिंगल विंडो सिस्टिम) कार्यन्वित केली आहे.

पुणे - अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने २०२३ -२४ या शैक्षणिक वर्षासाठी नवीन तंत्र शिक्षण संस्थांच्या मान्यतेसाठी ‘राष्ट्रीय एक खिडकी प्रणाली’ (नॅशनल सिंगल विंडो सिस्टिम) कार्यन्वित केली आहे. तंत्र शिक्षण परिषदेने नवीन संस्थांना मान्यता देण्याच्या प्रक्रियेसंदर्भात जाहीर केलेल्या हॅण्डबूकमध्ये या प्रणालीबाबत सांगितले आहे.

देशात नव्या तंत्र शिक्षण संस्थांच्या मान्यतेसाठी ‘एनएसडब्ल्यूएस’ ही प्रणाली कार्यन्वित केली आहे. तंत्र शिक्षण संस्थांच्या मान्यतेचा मार्ग अधिक सूकर व्हावा, या उद्देशाने ‘https://www.nsws.gov.in’ पोर्टल खुले करण्यात आले आहे. त्यामुळे नव्याने संस्था सुरू करणाऱ्यांना या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. या पोर्टलवर नवीन तंत्र शिक्षण संस्था सुरू करण्यासाठी ६ एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. तसेच विलंस शुल्कासह १३ एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येतील, अशी माहिती राज्याचे तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता राज्यातील अभियांत्रिकी, हाॅटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, व्यवस्थापनशास्त्र, एमसीए, डिझाईन, प्लॅनिंग या अभ्यासक्रमांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर पदविका स्तरावरील संस्था सुरू करण्यासाठी या पोर्टलवर सादर केलेल्या संस्थांच्या अर्जावर शासनाचे अभिप्राय परिषदेस सादर करायचे असतात. संबंधित संस्थांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर प्रत्यक्ष तपासणीसह सर्व औपचारिक कार्यवाही होऊन प्रत्यक्ष शासनाचे अभिप्राय तंत्र शिक्षण परिषदेस सादर करण्यासाठी पुरेसा अवधी मिळणे अपेक्षित आहे. त्यासंदर्भातील सूचना डॉ. मोहितकर यांनी परिपत्रकात दिल्या आहेत. हे परिपत्रक तंत्र शिक्षण संचालनालयाच्या ‘https://dte.maharashtra.gov.in’ संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचाही यादीत समावेश; मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा निर्णय

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

Marathi News Live Updates: १७ डिसेंबरनंतर बघू, सरकारला जरांगे पाटलांचा थेट इशारा; तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतर पुढची भूमिका काय?

Community Book Bank: ममदापुरात लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळेत बुक बँक सुरू; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अवांतर वाचनाचे नवे दालन

SCROLL FOR NEXT