NEET PG exam postpone demand by students Team esakal
एज्युकेशन जॉब्स

NEET PG Exam: परीक्षा पुढे ढकलण्याची सोशल मीडियावरून मागणी

राष्ट्रीय परीक्षा मंडळाने ‘नीट पीजी २०२२’ची परीक्षा १२ मार्च रोजी घेण्याचे ठरविले आहे. मात्र राज्यात सध्या पदव्युत्तर पदवर वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया यंदा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि अन्य कारणांमुळे उशीरा सुरू झाली.

सकाळ वृत्तसेवा

राष्ट्रीय परीक्षा मंडळाने ‘नीट पीजी २०२२’ची परीक्षा १२ मार्च रोजी घेण्याचे ठरविले आहे. मात्र राज्यात सध्या पदव्युत्तर पदवर वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया यंदा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि अन्य कारणांमुळे उशीरा सुरू झाली.

मुंबई - राष्ट्रीय परीक्षा मंडळाने ‘नीट पीजी २०२२’ची परीक्षा (NEET PG 2022 Exam) आणि त्याची जाहीर केलेली तारीख ही चुकीची असल्याचा दावा करत ही परीक्षा पुढे ढकलण्यात (Postpond) यावी अशी मागणी विद्यार्थ्याकडून सोशल (Social Media) केली जात आहे. (NEET PG exam postpone demand by students)

राष्ट्रीय परीक्षा मंडळाने ‘नीट पीजी २०२२’ची परीक्षा १२ मार्च रोजी घेण्याचे ठरविले आहे. मात्र राज्यात सध्या पदव्युत्तर पदवर वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया यंदा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि अन्य कारणांमुळे उशीरा सुरू झाली. यामुळे २०२१ची केंद्राची प्रवेशफेरी सोमवारी, १७ जानेवारीपासून सुरू होणार आहे. या प्रवेश फेऱ्या १५ मार्चपर्यंत चालणार आहेत. त्यामुळे या प्रवेश फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरच राज्यातील जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये जर विद्यार्थ्यांना पाहिजे त्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला नाही तर अनेक विद्यार्थी पुन्हा प्रवेश परीक्षा देतात आणि पुढील वर्षी प्रवेशासाठी प्रयत्न करत असतात, अशी माहिती विद्यार्थ्यांकडून देण्यात आली.

१२ मार्च रोजी नीट पीजी २०२२ ची परीक्षा झाल्यास राज्यातील १५० विद्यार्थ्यांची संधी हुकण्याची शक्यता आहे. शिवाय सर्वाधिक केरळमधील ३६०० विद्यार्थ्यांची इंटर्नशिप ऑगस्ट महिन्यात संपणार आहे. गुजरातमधील ३०० विद्यार्थ्यांची इंटर्नशिप जुलै महिन्यात संपणार आहे. हाच मुद्दा अन्य राज्यातील विद्यार्थ्यांचाही आहे. तरीही ही प्रवेश परीक्षा पुढे ढकलली नाही तर विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाईल.अशी भीती विद्यार्थी सोशल मीडियाद्वारे व्यक्त करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT