NEET UG  esakal
एज्युकेशन जॉब्स

NEET Exam : NEET UG प्रवेशपत्र जाहीर; असं करा डाऊनलोड

नीट यूजी २०२२ परीक्षा १७ जुलै २०२२ रोजी होणार आहे.

धनश्री ओतारी

नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेण्यात येणार्‍या नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्टसाठी प्रवेशपत्र जारी होण्याची विद्यार्थी बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. अखेर एनटीएने प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. नीट यूजी २०२२ परीक्षा १७ जुलै २०२२ रोजी होणार आहे.(neet ug admit card 2022 released candidate can check on neet nta nic in)

यावेळी नीट यूजी २०२२ परीक्षेसाठी 18 लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. 17 जुलै रोजी परीक्षा होणार आहे. यासाठी परीक्षेसाठी उमेदवार थेट लिंकद्वारे प्रवेशपत्र पाहू शकतील. ते डाउनलोड करण्यासाठी त्यांना त्यांचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि सुरक्षा पिन वापरावे लागेल. प्रवेशपत्राच्या हार्डकॉपीशिवाय उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश करता येणार नाही. (NEET-UG 2022)

NEET UG Admit Card: असे करा डाऊनलोड

नीट एनटीएची अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर जा.

होमपेजवर, 'नीट यूजी २०२२ प्रवेशपत्र डाउनलोड करा' लिंक वर क्लिक करा

एक नवीन पेज खुले होईल.

अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख यासारखी आवश्यक लॉगिन क्रेडेन्शियल्स भरा.

तुमचे नीट यूजी २०२२ प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.

प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.

नीट परीक्षा 91,415 मेडिकल, 26,949 डेंटल दंत, 52,720 आयुष आणि 603 पशुवैद्यकीय जागांसाठी घेतली जाणार आहे. ही परीक्षा 13 भाषांमध्ये घेतली जाणार आहे. बीएससी नर्सिंग आणि लाइफ सायन्स अभ्यासक्रमांसाठीही नीट (NEET) स्कोअरचा उपयोग होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Parishad Election : अंबादास दानवेंसाठी काँग्रेसनं घेतली माघार; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा देताना 'मविआ'मध्ये नक्की कोणती झाली 'डील'?

Artificial Mango Ripening : सावधान! तुम्ही खाल्लेला आंबा नैसर्गिक की केमिकलने पिकवलेला? 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Love Numerology : प्रेमात पक्के 420 असतात 'या' 3 मुलांकाचे लोक; तुमच्या पाठीत कधी खंजीर खुपसतील कळणारही नाही

Latest Marathi News Live Update : भाजप सर्व राज्यांमध्ये विजयी होईल- स्वाती मालीवाल

India Census 2026 : राज्यात १ मे पासून जनगणना, विचारले जाणार 'हे' प्रश्न; चुकीची माहिती दिल्यास होणार तब्बल 'इतका' दंड

SCROLL FOR NEXT