new joining jobs in office and tips for women in kolhapur 
एज्युकेशन जॉब्स

नवीन ऑफिस जॉइन करताय? कामाच्या ठिकाणी वावरताना लक्षात ठेवा या 4 गोष्टी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : नोकरीच्या ठिकाणी आपण एका वेगळ्या वातावरणात असतो. तिथले लोक कामामुळे ओळखीचे झालेले असतात. सरकारी असो किंवा खासगी जेव्हा ऑफिस, नोकरीचं ठिकाण बदलतं तेव्हा नवीन उत्साह असतो. काम करण्यासाठी नवीन वातावरण, नवीन आव्हाने असतात. वर्किंग वूमन्ससाठी नवीन जॉब प्रोफाइलमध्ये कंपनीच्या कामानुसार स्वत:ला सेट करणं थोडं आव्हानात्मक असतं. सुरुवातीचे काही दिवस महत्त्वाचे ठरतात. यामध्ये नव्या कंपनीचं काम समजून घेणं, नवीन सहकाऱ्यांशी जुळवून घेणं या गोष्टींचा समावेश असतो. नवीन ठिकाणी काळजीसुद्धा घ्यावी लागते. कारण तुम्ही ऑफिस पॉलिटिक्सला बळी पडू शकता. सुरुवातीला तुम्ही अपेक्षा पूर्ण करू शकला नाहीत तर तुमच्याबद्दलचे मतही चुकीचं होऊ शकतं. 

कामाचे नियोजन

तुम्ही नवीन ठिकाणी जाता तेव्हा तिथल्या कामावर लक्ष द्या. संस्थेच्या कामाची पद्धत समजून तुमच्या कामाचे नियोजन तयार करा. नवीन ठिकाणी लहान लहान गोष्टी समजल्यानंतर तुम्ही आत्मविश्वासाने काम करू शकता. यासाठी नेहमी शिकण्याची तयारी ठेवा. कोणत्याही बाबतीत शंका असेल तर सहकाऱ्यांना विचारा आणि ज्यांचे काम चांगले आहे त्यांच्याकडून काम करण्याच्या पद्धती शिकून घेण्याचा प्रयत्न करा.

ध्येय निश्चित करा

नवीन संस्थेत तुम्हाला काही टार्गेट दिलं जाईल. त्यापेक्षा चांगलं कसं करता येईल याचा विचार करा. स्वत:ला मर्यादित गोष्टींमध्ये अडकून न ठेवता आपली कामगिरी सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न असावा. ऑफिसच्या टार्गेटसह स्वत:चे असे ध्येय ठेवा. प्रत्येक महिन्याला आपण ठरवलेल्या कोणत्या गोष्टी केल्या आणि काय चुका राहिल्या हे पाहा. त्या अडचणी दूर करण्यासाठी काय करता येईल याचा विचार करा.

शिकण्यावर लक्ष द्या

आधी कामाचा अनुभव असेल नसेल तरी नवीन ठिकाणची आव्हानं वेगळी असतात. अशावेळी तुम्हाला वेगळा विचार करण्याची आणि नवीन गोष्टी शिकण्याची गरज असते. आजुबाजुच्या लोकांकडून ज्या चांगल्या गोष्टी शिकता येतील आणि सकारात्मकपणे स्वीकारा. यामुळे नव्या वातावरणात तुमचे सहकाऱ्यांशी वाद होणार नाहीत. 

स्वत:वर विश्वास ठेवा

नव्या वातावरणात तुमच्या मनात एक भीती असते. काम करण्याची पद्धत वेगळी असते. जर यात तुमचं काम नीट झालं तर काही अडचण नाही. पण काही चुका झाल्या तर पुन्हा तीच चूक करू नका.

नवीन मित्र जोडा

ऑफिसमध्ये लोकांसोबत बोला, त्यांच्याशी शेअरिंग केलंत तर सहजपणे संवाद साधता येईल. यामुळे कोणत्याही प्रकारची मदत लागली तर ती घेता येईल. नव्या सहकाऱ्यांकडून कामाबाबतची आव्हाने, इतर अडचणी यावर सल्ला घेऊ शकता. संस्थेच्या कामाकाजाची पद्धतीही समजून घेऊ शकता. तुमच्या सहकाऱ्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध असतील तर तुम्ही नव्या ठिकाणा सहज रुळाल. ऑफिसमध्ये मित्र तयार करत असताना वेगळ्या ग्रुपमध्ये सहभागी होण्यापासून मात्र स्वत:ला दूर ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT