Pune University sakal
एज्युकेशन जॉब्स

Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नवीन नऊ अभ्यासक्रम सुरु

पारंपरिक अभ्यासक्रमांबरोबरच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आता कौशल्याभिमुख अभ्यासक्रमांची संख्याही वाढवली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पारंपरिक अभ्यासक्रमांबरोबरच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आता कौशल्याभिमुख अभ्यासक्रमांची संख्याही वाढवली आहे. आजवर केवळ कौशल्यविकास केंद्रापर्यंत मर्यादित असलेल्या अभ्यासक्रमांची व्याप्ती आता सर्व विभागांपर्यंत वाढली आहे. विविध विभागांतर्फे यंदा नऊ अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्यात आले असून, काही विषयांना प्रचंड प्रतिसाद पाहता प्रवेशसंख्याही वाढविली आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर कौशल्यविकास अभ्यासक्रमांचे विशेष महत्त्व आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी विद्यापीठाने ११७ अभ्यासक्रमांना प्रवेश दिले असून, त्यातील ६० हून अधिक अभ्यासक्रम हे कौशल्याभिमुख आहे. विद्यापीठातील तंत्रज्ञान विभागाचे प्रा. डॉ. सुमेध रामटेके सांगतात, ‘‘शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये साधारणतः नऊ अभ्यासक्रम आमच्या विभागामार्फत सुरू केले आहेत.

विशेष म्हणजे सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश पूर्ण झाले असून, डेटा सायन्ससारख्या विषयांची प्रवेशक्षमता वाढविली आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना कौशल्याभिमुख अभ्यासक्रमांद्वारे नोकरी मिळावी, असा आमचा उद्देश आहे. औद्यागिक आणि व्यावसायिक संस्थांसोबतही आम्ही करार करत आहोत.’

उद्योगांना अपेक्षीत कौशल्यांचा विचार करत विद्यापीठाने तंत्रज्ञानावर आधारित नवे अभ्यासक्रम सुरू केले असून, संशोधनाभिमुख अभ्यासक्रमांची रचनाही करण्यात येत आहे.

२०२३-२४ मधील नवे अभ्यासक्रम

  • सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (स्पर्धा परीक्षा विभाग)

  • प्रोफेशनल डिप्लोमा इन केमिकल सायकॉलॉजी

  • बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स- ॲप्लाइड आर्ट्स (तंत्रज्ञान)

  • बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स - प्रिंटिंग टेक्नॉलॉजी

  • सर्टिफिकेट कोर्स इन इट्रॉडक्शन टू ड्रोन टेक्नॉलॉजी

  • एमटेक इन सायंटिफिक इन्स्ट्रूमेंटेशन, मेडिकल डिव्हाइस ॲंड डायग्नॉस्टीक्स

  • पीजी डिप्लोमा इन ब्लॉक चेन प्रोजेक्ट मॅनेजमेंट

  • पीजी डिप्लोमा इन ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी

  • एमए इन जापनीज

विद्यापीठातील अभ्यासक्रमांची प्रवेशक्षमता

अभ्यासक्रम - प्रवेशक्षमता

पदविका (डिप्लोमा) - १२५०

पदव्युत्तर पदविका (पीजी डिप्लोमा) - ८०९

पदवी (डिग्री) - ४३४

पदव्युत्तर पदवी (मास्टर्स) - २९६७

प्रमाणपत्र (सर्टिफिकेट कोर्स) - २२५०

विद्यार्थ्याने प्राप्त केलेले ज्ञान हे व्यावहारिक आणि व्यावसायिक उपयोगाशी जोडले गेले पाहिजे. म्हणून विद्यापीठातील बहुतेक सर्व विभागांनी कौशल्याभिमुख अभ्यासक्रम सुरू केले असून, त्यासाठी प्रत्यक्ष उद्योगांतील तज्ज्ञांचे सहकार्य घेण्यात येत आहे. त्याद्वारे अभ्यासक्रमांचे अद्ययावतीकरणही केले जात आहे.

- डॉ. पराग काळकर, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

कौशल्यविकासाबरोबरच आंतरविद्याशाखीय आणि बहुविद्याशाखीय अभ्यासक्रमांवर आमचा भर आहे. विद्यार्थ्यांमध्ये नवउद्योजकतेबरोबरच नवसंशोधनालाही चालना मिळत असल्याने त्यांना व्यावसायिक आणि संशोधन क्षेत्रात प्राधान्य मिळत आहे. नवीन शैक्षणिक धोरणाला अभिप्रेत असलेल्या या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर पसंती आहे.

- डॉ. अविनाश कुंभार, प्रमुख, आंतरविद्याशाखीय प्रशाला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT