UPSCs Result of the Civil Services Examination Result announced esakal
एज्युकेशन जॉब्स

आधी IRS आता IAS; निवृत्ती आव्‍हाडांची यशाची हॅट्रिक!

अरूण मलाणी


नाशिक : स्‍पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी गुळवंच (ता. सिन्नर) येथील निवृत्ती सोमनाथ आव्‍हाड आदर्शवत उदाहरण ठरले आहे. यापूर्वी एमपीएससी परीक्षेतून (MPSC exam) कक्ष अधिकारी व यूपीएससीत यशस्‍वी होताना भारतीय महसूल सेवेत (IRS) दाखल झाले. पण आपल्‍याला आयएएस (IAS) अधिकारीच व्‍हायचे, या उद्देशाने त्‍यांनी प्रयत्‍न सुरू ठेवले. सामान्‍य शेतकरी कुटुंबातून आलेल्‍या निवृत्ती आव्‍हाड यांनी स्‍पर्धा परीक्षेत यशाची हॅट्ट्रिक करताना आयएएस होण्याच्‍या स्‍वप्‍नाला गवसणी घातली आहे.

खासगी कंपनीत नोकरी ते IAS

फारसे शिक्षण न झालेल्‍या आई-वडिलांनी शेती करताना आपल्‍या मुलांना भरपूर शिकविण्याचा ध्यास ठेवला. यातून निवृत्ती आव्‍हाड यांनी मामाच्‍या गावी सातवीपर्यंत शिक्षण घेतले. यानंतर बारागाव पिंप्री येथील न्‍यू इंग्‍लिश स्‍कूल येथून दहावीपर्यंत शिक्षण घेताना, पुढे सिन्नर येथील मविप्र महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी पुणे गाठत सिंहगड इन्‍स्‍टिट्यूटमधून मॅकेनिकल शाखेतून अभियांत्रिकी पदवी शिक्षण पूर्ण केले. यानंतर तीन वर्षे खासगी कंपनीत नोकरी केली. नोकरी करताना त्‍यांना स्‍पर्धा परीक्षांच्या तयारीचा विचार मनात आला. कुटुंबीयांनीही निर्णयाचे समर्थन केले. तेथून त्‍यांच्‍या जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली.

स्‍पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी आदर्शवत उदाहरण ठरलेले निवृत्ती सोमनाथ आव्‍हाड आहे.

यशाचा प्रवास

स्‍पर्धा परीक्षांची तयारी सुरू केल्‍यानंतर एमपीएससीच्‍या २०१५-१६ मध्ये झालेल्‍या परीक्षेत कक्ष अधिकारी पदाला गवसणी घातली. व्‍हायचे तर आयएएस अधिकारीच, असा मनाशी दृढ निश्‍चय असल्‍याने स्‍पर्धा परीक्षांची तयारी त्‍यांनी सुरू ठेवली. त्‍यातच २०१६ च्‍या यूपीएससी परीक्षेत ७०६ व्‍या क्रमांकासह यश मिळविताना भारतीय महसूल सेवेत (IRS) दाखल झाले. सध्या ते जबलपूर येथे प्राप्तिकर विभागात सहाय्यक आयुक्‍तपदाची धुरा सांभाळत आहेत. यादरम्‍यान पत्‍नी पूजा, साडेतीन वर्षांचा मुलगा राजवीर यांच्‍यासमवेत जबलपूर येथे जबाबदारी सांभाळताना तयारी सुरू ठेवली होती.

संयम सर्वांत महत्त्वाचा

स्‍पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना संयम ठेवण्याचा सल्‍ला निवृत्ती आव्‍हाड देतात. आपले अंतिम ध्येया गाठेपर्यंत प्रयत्‍नात सातत्‍य व प्रामाणिकपणा असायला हवा. कठोर मेहनतीसोबत संयम बाळगता आला पाहिजे, असे त्‍यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT