दक्षिण मध्य रेल्वे Gallery
एज्युकेशन जॉब्स

उत्तर मध्य रेल्वेमध्ये होतेय क्रीडा कोट्याअंतर्गत विविध पदांची भरती

सरकारी नोकरी! उत्तर मध्य रेल्वेमध्ये होतेय क्रीडा कोट्याअंतर्गत विविध पदांची भरती

सकाळ वृत्तसेवा

उत्तर मध्य रेल्वे क्रीडा कोट्याअंतर्गत विविध पदांची भरती करणार आहे.

सोलापूर : सरकारी नोकरीची (Government Jobs) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उत्तर मध्य रेल्वे (North Central Railway) क्रीडा कोट्याअंतर्गत (Sports Quota) विविध पदांची भरती (Recruitment) करणार आहे. त्याअंतर्गत बॉक्‍सिंग (Boxing), क्रिकेट (Cricket), जिम्नॅस्टिक्‍स (Gymnastics), हॉकी (Hocky), ऍथलीट (Athlete), पॉवर लिफ्टिंग (Power Lifting), टेनिस (Tennis), टेबल टेनिस (Table Tennis) आणि वेट लिफ्टिंगसाठी (Weight Lifting) या नियुक्‍त्या घेण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत या खेळांशी संबंधित असलेले सर्व उमेदवार या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना rrcpryj.org ला भेट द्यावी लागेल. अर्जदारांनी हे लक्षात ठेवावे, की अधिकृत अधिसूचना वाचल्यानंतर या पदांवर अर्ज करा, कारण फॉर्ममध्ये काही विसंगती आढळल्यास अर्ज नाकारला जाईल.

उत्तर मध्य रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, हे लक्षात घ्यावे की अर्ज भरताना उमेदवारांना 500 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल. उमेदवारांनी नोंद घ्यावी की त्यांना अर्ज करताना त्यांची शैक्षणिक पात्रता, जन्मतारखेचा पुरावा, संबंधित क्रीडा प्रमाणपत्र आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतील. उमेदवारांनी नोंद घ्यावी, की अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 डिसेंबर 2021 आहे. शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.

'या' तारखा लक्षात ठेवा

  • ऑनलाइन अर्जाची सुरुवातीची तारीख : 26 नोव्हेंबर 2021

  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 25 डिसेंबर 2021

जाणून घ्या वयोमर्यादा...

रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, उमेदवारांचे वय 1 जानेवारी 2022 रोजी किमान 18 वर्षे आणि 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवारांना शैक्षणिक पात्रता आणि पदांशी संबंधित इतर तपशील तपासण्याचा सल्ला दिला जातो. अधिक माहितीसाठी भरती मंडळाने जारी केलेली तपशीलवार अधिकृत अधिसूचना पाहू शकता.

तसेच, नुकतेच दक्षिण पूर्व रेल्वे, पूर्व मध्य रेल्वे आणि दक्षिण रेल्वेने भरतीची अधिसूचना काढली. दक्षिण पूर्व रेल्वे 1785 पदांसाठी भरती करत आहे. त्याचबरोबर पूर्व मध्य रेल्वेमार्फत 5 पदांची भरती करण्यात येत आहे. त्याचवेळी दक्षिण रेल्वे 21 पदांची भरती करत आहे. यामध्ये अर्ज सुरू झाले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख वेगळी आहे. त्यामुळे उमेदवार अधिकृत अधिसूचना तपासू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain Like Alcohol: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT