एज्युकेशन जॉब्स

NEET ची Answer Key आज होणार जाहीर? 'असे' करा Download

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश चाचणीची 'Answer Key' आज 25 सप्टेंबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.

NEET Answer Key 2021 : राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश चाचणीची (NEET 2021) 'Answer Key' आज 25 सप्टेंबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी Answer Key आज जाहीर करेल. या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या NEET परीक्षेत सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांनी पदवीपूर्व वैद्यकीय आणि डेंटल अभ्यासक्रमासाठी हजेरी लावली. दरम्यान, परीक्षेला बसलेले उमेदवार एजन्सीच्या अधिकृत वेबसाइटला neet.nta.nic.in भेट देऊन परीक्षा 'उत्तर की' डाउनलोड करू शकतील.

NEET Answer Key 2021 : डाउनलोड कसे करावे?

  1. सर्वप्रथम उमेदवाराने अधिकृत वेबसाइटला neet.nta.nic.in भेट द्यावी.

  2. तद्नंतर मुख्यपृष्ठावर प्रदर्शित Answer Key लिंकवर क्लिक करावे.

  3. तुमचे लॉगिन क्रेडेन्शियल एंटर करा आणि सबमिट करा.

  4. आता 'उत्तर की' डाउनलोड करा आणि ती आपल्याकडे जपून ठेवा.

  5. 'उत्तर की'विरोधात कोणताही आक्षेप मांडण्याची परवानगी दिली जाणार नाही.

जाहीर करण्यात येणारी 'उत्तर की' ही अंतिम असेल आणि त्यावर कोणताही आक्षेप स्वीकारला जाणार नाही. NEET वैद्यकीय आणि डेंटल अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी सुमारे 55,000 जागा उपलब्ध आहेत. ही परीक्षा 12 सप्टेंबर रोजी घेण्यात आली होती, ज्यासाठी उत्तर की जारी करणं बाकीय. दरम्यान, उत्तर की किंवा निकालाच्या तारखेची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, मागील वर्षांच्या कलानुसार, असा अंदाज लावला जात आहे, की Answer Key आज 25 सप्टेंबर रोजी जारी केली जाऊ शकते, असं कळतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT