Exam Sakal
एज्युकेशन जॉब्स

ऑफलाईन परीक्षा सर्व समावेशक असाव्यात; तज्ज्ञांचे मत

राज्यातील विद्यापीठांना १५ फेब्रुवारीनंतर ऑफलाईन परीक्षा घेण्यास उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मान्यता दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

राज्यातील विद्यापीठांना १५ फेब्रुवारीनंतर ऑफलाईन परीक्षा घेण्यास उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मान्यता दिली आहे.

पुणे - विद्यार्थ्यांच्या (Student) शैक्षणिक मूल्यमापनासाठी विद्यापीठाने ऑफलाईन परीक्षेला (Offline Education) प्राधान्य द्यावे. हे करत असताना नवीन शैक्षणिक धोरणात (Educational Policy) अभिप्रेत निरनिराळ्या मूल्यमापन पद्धतीचा वापर करावा. जेणेकरून ऑफलाईन परीक्षा पद्धत सर्वसमावेशक होईल, असे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

राज्यातील विद्यापीठांना १५ फेब्रुवारीनंतर ऑफलाईन परीक्षा घेण्यास उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. मात्र परीक्षा ऑफलाईन घ्यायची की ऑनलाईन हा निर्णय विद्यापीठ स्तरावर घ्यावा, असे आदेशात स्पष्ट म्हटले आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षे ऑनलाईन परीक्षेतील त्रुटी आणि मर्यादा लक्षात आल्या आहेत. मूल्यमापन पद्धतीबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. संजय चाकणे म्हणाले, ‘परीक्षा ऑफलाईनच घ्यायला हवी, या मताचा मी आहे. ऑनलाईन परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांचे परिपूर्ण मूल्यमापन होत नाही. नवीन शैक्षणिक धोरणात सुचविलेल्या विविध मूल्यमापन पद्धतींचा आपण अवलंब करू शकतो. शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन मूल्यमापन पद्धतीचा अवलंब करायला हवा.’ शासनाने जरी ऑफलाईन परीक्षेला परवानगी दिली असली, तरी काही विद्यापीठांची ऑनलाईन परीक्षेसाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे पुढील आठवडाभरातच विद्यापीठांच्या परीक्षापद्धतींबद्दल स्पष्टता येईल.

तज्ज्ञ म्हणतात..

- ऑनलाईन परीक्षेमुळे एकांगी मूल्यमापन, त्यामुळे तो परिपूर्ण पर्याय असूच शकत नाही

- शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईनच असावी

- सातत्यपूर्ण मूल्यमापन पद्धतीचा अवलंब करावा

- मुलाखत, प्रात्यक्षिके, प्रकल्प, चर्चा आदी नवीन शैक्षणिक धोरणातील मूल्यमापन पद्धतीचा अवलंब करावा

- अंतर्गत मूल्यमापनावर अधिक भर हवा

- ऑनलाईन परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

पुणे विद्यापीठाचे ऑनलाईन नियोजन..

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षांचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला आहे. त्याची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. या बद्दल विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे म्हणाले,‘‘ऑनलाईन परीक्षा हा मूल्यमापनाचा परिपूर्ण पर्याय ठरू शकत नाही. मात्र, कोरोनाच्या परिस्थिती आणि तेंव्हाचे शासन निर्णय पाहून विद्यापीठाने मागेच ऑनलाईन परीक्षांचा निर्णय घेतला आहे. आता त्या परीक्षांचे नियोजनही सुरू आहे. पुढील काही दिवसांतच परीक्षांच्या तारखा घोषित होतील. या संबंधीचा काही निर्णय घ्यायचा असेल, तर तो कुलगुरू आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळ घेईल.’’

परीक्षांसंदर्भात विद्यार्थ्यांची मानसिकता सध्या दोलायमान स्थितीत आहे. ऑनलाईन परीक्षांमुळे त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे ऑफलाईन परीक्षांना प्राधान्य द्यायला हवे. सातत्यपूर्ण मूल्यांकन आणि निरनिराळ्या पद्धतींचा वापर करत ऑफलाईन परीक्षा घ्यायला हव्यात. यासंबंधी विद्यापीठानेच कार्यपद्धती निश्चित करायला हवी.

- डॉ. पंडित विद्यासागर, माजी कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा आज दिल्लीकडे मोर्चा

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT