Oil India Limited Recruitment 2022 esakal
एज्युकेशन जॉब्स

Oil India Limited मध्ये BSc तरुणांसाठी नोकरीची संधी

सकाळ डिजिटल टीम

ऑइल इंडिया लिमिटेडनं विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

Oil India Limited Recruitment 2022 : ऑइल इंडिया लिमिटेडनं (Oil India Limited) वॉर्डन (Warden) आणि केमिकल असिस्टंट पदांच्या (Chemical Assistant Posts) भरतीसाठी नुकतेच अर्ज मागविले आहेत. या अंतर्गत एकूण 28 पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. यामध्ये वॉर्डन (महिला) 3 आणि केमिकल असिस्टंटच्या 25 पदांचा समावेश आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांकरिता अर्ज करण्यासाठी https://www.oil-india.com/ या वेबसाइटवरती जावून आपला अर्ज करू शकता. या अंतर्गत वॉर्डन पदासाठी अर्ज करणारे उमेदवार 8 मार्च 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. तर, केमिकल असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 15 मार्च 2022 पर्यंत मुदत देण्यात आलीय. दरम्यान, शेवटच्या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असंही ऑइल इंडियानं सांगितलंय.

महत्त्वाच्या तारखा

वॉर्डन (महिला) Warden Posts पदांसाठी नोंदणीची तारीख आणि वेळ - 8 मार्च 2022 (सकाळी 7:00 ते सकाळी 11:00)

केमिकल असिस्टंट पदांसाठी (Chemical Assistant Posts) नोंदणीची तारीख आणि वेळ - 15 मार्च 2022 (सकाळी 7:00 ते सकाळी 11:00)

ऑइल इंडिया लिमिटेडनं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या नियुक्त्या कराराच्या आधारावर केल्या जाणार आहेत. तर, वॉर्डन महिला पदासाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांकडं होमसायन्समध्ये B.Sc पदवी किंवा हाउसकीपिंग/केटरिंगमध्ये डिप्लोमा असणं आवश्यक आहे. याशिवाय, केमिकल असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना B.Sc मध्ये रसायनशास्त्र (Chemistry) विषय असणं बंधनकारक आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना नीट वाचून, त्यानुसार अर्ज करावा. कारण, कोणत्याही अर्जामध्ये काही विसंगती आढळल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

Latest Maharashtra News Updates : ..मग महाराष्ट्रात भाषे वरून भांडणे का लावली जात आहेत? - संजय राऊतांचा सवाल!

Farmer Situation : औसा तालुक्यातील शिवणी (बु.) येथील वृद्ध शेतकरी दांपत्य ओढताहेत हाताने कोळपे

टीआरपीमध्ये अचानक वर आली 'ही' मालिका; 'या' मालिकांना टाकलं मागे; अभिनेत्याने केली खास पोस्ट

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

SCROLL FOR NEXT