School Uniform sakal
एज्युकेशन जॉब्स

School Uniform : ‘एक राज्य-एक गणवेश’चा आदेश

राज्यातील सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना एकसमान गणवेश देण्यासाठी राज्यात ‘एक राज्य-एक गणवेश’ या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सोमवारी शासन आदेश जारी केला आहे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना एकसमान गणवेश देण्यासाठी राज्यात ‘एक राज्य-एक गणवेश’ या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सोमवारी शासन आदेश जारी केला आहे; मात्र यात मागील धोरणातील निर्णय बदलण्यात आल्याने संभ्रम वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

नवीन आदेशाप्रमाणे आता सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी नियमित गणवेश निश्चित करण्यात आला असून तर उर्वरित दिवशी म्हणजे मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी हे तीन दिवस स्काऊट आणि गाईडचे गणवेश निश्चित करण्यात आले आहेत.

यामुळे येत्या काही दिवसांत गणवेशावरून वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शाळा सुरू होण्यासाठी केवळ पाच दिवसांचा कालावधी उरलेला असताना अशा प्रकारच्या आदेशाची अंमलबजावणी जारी केल्याने यावर शिक्षणतज्ज्ञांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

गणवेशासंदर्भात निर्णय घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून धोरणात अनेकदा बदल केले जात असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘एक राज्य एक गणवेश’ धोरण निश्चित करण्यात आले होते; मात्र आता पुन्हा धोरणात बदल करून तीन दिवस नियमित गणवेश आणि तीन दिवस स्काऊट- गाईडप्रमाणे गणवेश निश्चित करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! घरगणनेच्या काळातच शिक्षकांची ‘टीईटी’; २१ जूनला होणार शिक्षक पात्रता परीक्षा; २७ मार्च ते १६ एप्रिलपर्यंत करता येणार अर्ज

Merchant Abducted : दीड कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण; अपहृत व्यापाऱ्याची सुखरूप सुटका, पाच आरोपींना अटक

Solapur News : सावळेश्वर टोलनाका पुन्हा वादात! चालकाला रक्तबंबाळ करेपर्यंत मारले; पोलिसांनी आवळल्या मुसक्या.

Pune University : पुणे विद्यापीठाला अखेर मिळाले कुलसचिव; छुप्या पद्धतीने नियुक्ती केल्याचा संघटनांचा आरोप

Pune News : विना अडथळा खोदकाम करता येणार; पाइपलाइन गॅस व सीएनजी वितरणासाठी केंद्र सरकारचा नवा आदेश

SCROLL FOR NEXT