Online Admission Process Sakal
एज्युकेशन जॉब्स

Online Admission : केंद्रीय विद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेस सुरवात

केंद्रीय विद्यालय संघठन यांच्या वतीने देशभरातील केंद्रीय विद्यालयांमधील इयत्ता पहिली ते बारावीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - केंद्रीय विद्यालय संघठन यांच्या वतीने देशभरातील केंद्रीय विद्यालयांमधील इयत्ता पहिली ते बारावीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इयत्ता पहिलीतील प्रवेशासाठी १५ एप्रिलपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. पहिलीसाठी ३१ मार्चपर्यंत बालकांचे किमान सहा वर्ष वय पूर्ण असणे अपेक्षित आहे, असे संघठनतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

देशातील एक हजार २५४ केंद्रीय विद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. केंद्रीय विद्यालयाच्या संघटनतर्फे पोर्टलद्वारे ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. केंद्रीय विद्यालयातील इयत्ता पहिलीच्या प्रवेश प्रक्रियेतील ऑनलाइन नोंदणीला सोमवारपासून सुरू झाली असून ती १५ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. तर इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया दहावीच्या निकाल लागल्यानंतर दहा दिवसांनी सुरू करण्यात येईल.

याबरोबरच बालवाटिकेतील (पूर्व प्राथमिक) प्रवेशाची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. इयत्ता पहिलीच्या प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाइनद्वारे राबविण्यात येते. तर इयत्ता दुसरीपासून पुढील प्रवेश प्रक्रिया त्या-त्या केंद्रीय विद्यालयात उपलब्ध असणाऱ्या जागांनुसार प्रत्यक्ष राबविण्यात येते.

प्रवेश प्रक्रियेतील महत्त्वाच्या तारखा :

तपशील : कालावधी

- इयत्ता पहिलीसाठी ऑनलाइन नोंदणी : १५ एप्रिलपर्यंत

- इयत्ता पहिलीसाठी निवड आणि प्रतीक्षा यादी : पहिली तात्पुरती यादी- १९ एप्रिल, दुसरी तात्पुरती यादी- २९ एप्रिल आणि तिसरी तात्पुरती यादी- ८ मे

- इयत्ता पहिलीसाठी दुसरी नोटीस (गरज पडली तर) : ७ ते १५ मे

- इयत्ता दुसरी आणि पुढील इयत्तांसाठी : १० एप्रिलपर्यंत

‘केव्हीएस’ ॲप केलेली नोंदणी ठरणार अवैध

केंद्रीय विद्यालयांमध्ये इयत्ता पहिलीला प्रवेश मिळविण्यासाठी अनेक पालक ‘केव्हीएस मोबाईल ॲप’चा वापर करता आहे. या ॲपद्वारे पालक आपल्या पाल्याच्या इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी करत असल्याचे दिसून येत आहे. परंतु, या ॲपद्वारे केलेली नोंदणी ही अवैध धरण्यात येईल. केंद्रीय विद्यालयातील इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी केवळ ‘https: //kvsonlineadmission.kvs.gov.in/’ या पोर्टलवर केलेली ऑनलाइन नोंदणी ग्राह्य धरण्यात येईल, असे केंद्रीय विद्यालय संघठनने स्पष्ट केले आहे.

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ -

- https://kvsangathan.nic.in/

- https://kvsonlineadmission.kvs.gov.in/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT