isro
isro sakal
एज्युकेशन जॉब्स

ISRO Opportunity : नववीच्या विद्यार्थ्यांना इस्रोत जाण्याची संधी

सम्राट कदम

तुमचा पाल्य जर इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असेल, तर त्याला भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.

पुणे - तुमचा पाल्य जर इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असेल, तर त्याला भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. बाल शास्त्रज्ञांसाठीचा युविका म्हणजे युवा विज्ञानी कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. १५ ते २६ मे दरम्यान इस्रोच्या केंद्रांवर हा कार्यक्रम पार पडेल.

विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञान, तंत्रज्ञान, नवे शोध आणि करिअरच्या वाटांबद्दल लहान वयातच योग्य दिशा मिळावी म्हणून या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. इस्रोच्या अधिकृत संकेतस्थळावर या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजेनिवड प्रक्रियेत ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना १५ टक्के अधिक गुण मिळणार असून, याचा थेट फायदा जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना होणार आहे. गुणवत्ता यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या जाण्या-येण्याचा व राहण्याचा खर्च इस्रोच्या वतीने करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या तारखा -

  • २० मार्च - अर्ज भरण्यास सुरुवात

  • ३ एप्रिल - अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

  • १० एप्रिल - पहिली निवड यादी

  • २० एप्रिल- दुसरी निवड यादी

  • १४ मे - विद्यार्थी इस्रोच्या विविध केंद्रांवर हजर होतील.

  • १५ मे - २६ मे - युविका विज्ञान शिबीर

असे मिळतील गुण -

१. इयत्ता आठवीतील किंवा शेवटच्या परीक्षेतील गुण - ५० टक्के

२. ऑनलाइन क्विझ मधील कामगिरी - १० टक्के

३. विज्ञान प्रदर्शनात सहभाग - १७ टक्के

४. ऑलिम्पियाड परीक्षेतील रँक - ११ टक्के

५. क्रीडा स्पर्धांचे विजेते - ११ टक्के

६. स्काऊट आणि गाईड/ एनसीसी/ एनएसएस - ५ टक्के

७. ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत जिल्हा परिषद किंवा इतर शाळेतील विद्यार्थी - १५ टक्के

इथे पार पडणार शिबीर -

१. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ रिमोट सेंसिग, डेहराडून

२. विक्रम साराभाई स्पेस सेंटर, तिरुअनंतपुरम

३. सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकोटा

४. यू. आर. राव सटेलाईट सेंटर, बेंगळुरू

५. स्पेस ॲप्लिकेशन सेंटर, अहमदाबाद

६. नॅशनल रिमोट सेन्सिग सेंटर, हैदराबाद

७. नॉर्थ ईस्ट स्पेस ॲप्लिकेशन सेंटर, शिलाँग

अधिक माहिती आणि अर्जासाठीचे संकेतस्थळ - https://www.isro.gov.in/YUVIKA.html

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT