UGC sakal
एज्युकेशन जॉब्स

NEP Sarathi : एनईपीसाठी विद्यार्थ्यांनाच राजदूत बणण्याची संधी; महाविद्यालयातून होणार तीघांची निवड

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विद्यार्थ्यांनाच प्रसारक बणण्याचा अनोखा उपक्रम विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) हाती घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विद्यार्थ्यांनाच प्रसारक बणण्याचा अनोखा उपक्रम विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) हाती घेतला आहे. उच्च शिक्षणविषयक तरतुदी आणि शिफारशींचा प्रचार-प्रसारासाठी ‘एनईपी सारथी’ची रचना करण्यात आली आहे. देशभरातील प्रत्येक शैक्षणिक संस्थेतील तीन विद्यार्थ्यांची सारथी म्हणून निवड केली जाणार आहे. जे विद्यार्थी राजदूत म्हणून काम करतील, असे युजीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आयोगाकडून याबाबत देशातील सर्व विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांना पत्र पाठवून तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यास सांगितले आहे. त्याबाबतची माहिती सहा जूनपर्यंत आयोगाकडे सादर करावी लागणार आहे. भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये एनईपीच्या माध्यमातून अनेक सुधारणा होणार आहे. त्यामध्ये शिक्षणाचा दर्जा, समानता आणि उपलब्धता यावर अधिक भर आहे. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. तसेच विद्यापीठांचे कुलगुरू, प्राचार्य, संचालक, प्राध्यापक, कर्मचारी यांचा एकत्रित तितकाच आवश्यक आहे.

उपक्रमाचा उद्देष्य -

विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवून उच्च शिक्षणातील विविध सुधारणांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी यूजीसीकडून एनईपी सारथी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये धोरणातील तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवा, धोरणाचा प्रचार-प्रसार व्हावा, या उद्देशाने त्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे. हे विद्यार्थी एनईपीसाठी युजीसीचे राजदूत म्हणून काम करतील.

विद्यार्थी राजदूतासाठी आवश्यक कौशल्ये -

- कोणत्याही शाखेतील तीन विद्यार्थ्यींची निवड करावी

- विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व चांगले असले पाहिजे.

- उत्कृष्ट संवाद कौशल्य, नेतृत्वगुण असे गुण आवश्यक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT