मिश्र धातू निगममध्ये सरकारी नोकऱ्या! Sakal
एज्युकेशन जॉब्स

नववर्षाभिनंदन! मिश्र धातू निगममध्ये सरकारी नोकऱ्या! विविध पदांची भरती

नववर्षाभिनंदन! मिश्र धातू निगममध्ये सरकारी नोकऱ्या! विविध पदांची भरती

सकाळ वृत्तसेवा

नूतन वर्ष 2022 मध्ये सार्वजनिक क्षेत्रात सरकारी नोकरी (PSU जॉब्स 2022) मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे.

नूतन वर्ष 2022 मध्ये सार्वजनिक क्षेत्रात सरकारी नोकरी (Government Jobs) (PSU Jobs 2022) मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. मिश्र धातू निगम लिमिटेड (MIDHANI Limited), ही भारत सरकारच्या (Government of India) मिनीरत्न कंपन्यांपैकी एक असून, कंपनीने विविध विभागांमध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, सहाय्यक व्यवस्थापक आणि व्यवस्थापक या पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. MIDHANI Limited ने 2021 वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबर 2021 रोजी जारी केलेल्या भरती (Recruitment) जाहिरातीनुसार सर्व पदांच्या एकूण 61 रिक्त जागा आहेत. नियमितपणे भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. (Opportunity for various government jobs in MIDHANI Limited in the new year)

जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

MIDHANI Limited व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी किंवा सहाय्यक व्यवस्थापक किंवा व्यवस्थापक पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. इच्छुक उमेदवार कंपनीच्या अधिकृत वेबसाइट midhani-india.in वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाइन फॉर्मद्वारे अर्ज करू शकतील. उमेदवारांना कंपनीच्या वेबसाइटला भेट दिल्यानंतर करिअर विभागात जावे लागेल, जिथे ऑनलाइन अर्जाची लिंक सक्रिय केली गेली आहे आणि भरतीच्या जाहिरातीची PDF डाउनलोड अधिसूचना लिंक (No.MDN/HR/E/6/21) दिली आहे. MIDHANI Limited द्वारे जाहिरात केलेल्या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2022 आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

पदनिहाय रिक्त पदांची संख्या

  • व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (मेटलर्जी) : 22 पदे

  • व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (यांत्रिक) : 15 पदे

  • व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (इलेक्‍ट्रिकल) : 6 पदे

  • व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (सिरामिक इंजिनिअर) : 1 पद

  • व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (प्रशासन/एचआर) : 4 पदे

  • व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (सिव्हिल) : 3 पदे

  • व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (सुरक्षा) : 1 पद

  • असिस्टंट मॅनेजर (मटेरिअल्स मॅनेजमेंट) : 3 पदे

  • असिस्टंट मॅनेजर (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) : 1 पद

  • असिस्टंट मॅनेजर (मेडिकल) : 1 पद

  • असिस्टंट मॅनेजर (आयटी) : 1 पद

  • व्यवस्थापक (ऑटोमेशन) : 1 पद

  • व्यवस्थापक (मेकॅनिकल) : 1 पद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीत भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, सहा वारकरी जखमी

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT