SSC HSC exam esakal
एज्युकेशन जॉब्स

SSC HSC Supplementary Exam : दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेत शुक्रवारी होणारे पेपर पुढे ढकलले

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेदरम्यान शुक्रवारी होणारे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यात काही जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी (ता.२६) अतिवृष्टी होईल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेदरम्यान शुक्रवारी होणारे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.

राज्य मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट २०२४मध्ये घेण्यात येणारी दहावीची पुरवणी परीक्षा १६ ते ३० जुलै आणि बारावीची पुरवणी परीक्षा १६ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान आयोजित केली आहे. या परीक्षेत शुक्रवारी (ता. २६) दहावीचा ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन’ या विषयाचा पेपर सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत होणार होता. आता हा पेपर ३१ जुलै रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक यावेळेत होईल.

तर बारावीच्या परीक्षेतील वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान आणि एम.सी.व्ही.सी. पेपर दोन (ईबी टू एक्सबी= २०) विषयांचे पेपर शुक्रवारी सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत होणार होते. आता हे पेपर नऊ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा ते दोन या वेळेत होणार आहेत.

दरम्यान, दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या लेखी आणि अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे राज्य मंडळाच्या सहसचिव मेधा निरफराके यांनी प्रकटनाद्वारे स्पष्ट केले आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षेचे बदललेले वेळापत्रक पुढीलप्रमाणे -

इयत्ता : विषय : यापूर्वीची नियोजित वेळापत्रक : सुधारित वेळापत्रकाचा तपशील

दहावी : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २ :  २६ जुलै (वेळ- सकाळी ११ ते दुपारी १) : ३१ जुलै (वेळ -सकाळी ११ ते दुपारी १)

बारावी : १. वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, २. अन्नशास्त्र व तंत्रज्ञान, ३. एम.सी.व्ही.सी पेपर २ (ईबी टू एक्स बी=२०) : २६ जुलै (वेळ सकाळी ११ ते दुपारी २) : ९ ऑगस्ट (वेळ सकाळी ११ ते दुपारी २)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT