parents school admission preference of english medium cbse board education nanded sakal
एज्युकेशन जॉब्स

Nanded : पाल्यांच्या प्रवेशासाठी पालकांची धावपळ; ‘सीबीएसई’ला पसंती : डोनेशनमुळे अनेकांचा हिरमोड

नांदेड जिल्ह्यातील शाळा उन्हाळी सुटीनंतर १५ जूनपासून सुरु होणार

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : विद्यार्थ्यांची परीक्षा आटोपली असली तरी प्रथमच शाळा प्रवेश घेणाऱ्या पाल्यांच्या पालकांची खरी परीक्षा सुरु झाली आहे. पसंतीच्या शाळांसाठी पालकांची धावपळ सुरु असून, ठराविक शाळांमध्येच प्रवेश मिळावा, म्हणून पालकांनी धावाधाव सुरु केली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांनाच पसंती दिली जात असून, त्यातही सीबीएसईच्या शाळांना पालकांचे अधिक प्राधान्य असल्याचे दिसून येत आहे.

नांदेड जिल्ह्यातील शाळा उन्हाळी सुटीनंतर १५ जूनपासून सुरु होणार आहेत. त्यापूर्वी विविध वर्गातील प्रवेशप्रक्रिया सुरु झाली आहे. आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आले. यात ज्यांना प्रवेश मिळाले नाहीत, ते आता लाखोंचे डोनेशन भरून पसंतीच्या शाळांसाठी धावपळ करताना दिसून येत आहे. गेले दोन महिन्यांपासून प्रवेशासाठी पालकांची भटकंती सुरु असून, अनेकांना पसंतीच्या शाळा मिळाल्या नसल्याने त्यांचा हिरमोड होताना दिसत आहे.

सध्या शहरातील बहुतांश खासगी सीबीएसई इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश अर्जांची विक्री बंद झाली आहे. राज्य मंडळाच्या खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पालक आपल्या पसंतीच्या शाळांमध्ये पाल्याला प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सीबीएसई व काही प्रमुख राज्य मंडळाच्या खासगी शाळांमध्ये फेब्रुवारीतच प्रवेश प्रक्रिया आटोपली आहे.

वाढत्या स्पर्धेने सीबीएसईला पसंती

व्यावसायिक अभ्यासक्रम व उच्च शिक्षणासाठीचा विचार करून आतापासूनच पाल्यांना स्पर्धात्मक शिक्षणासाठी तयार करण्याच्या दृष्टीने पालक सीबीएसईच्या शाळांना पसंती देत आहेत. राज्य मंडळाच्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या असल्या तरी पालकांना सीबीएसई शाळेतच त्यांच्या पाल्यांना प्रवेश हवा असतो. परिणामी शहरातील सीबीएसई शाळांमध्ये प्रवेशासाठी गर्दी होताना दिसत आहे.

डोनेशनमुळे अनेकांचा हिरमोड

सीबीएसई व काही राज्य मंडळाच्या शाळांनी प्रवेशासाठी लाखोंचे डोनेशन घेणे सुरु केले असल्याची माहिती आहे. त्यामुळे लाखो रुपये डोनेशन देवून प्रवेश घेण्याची क्षमता नसलेल्या पालकांना त्यांच्या पाल्यास पसंतीच्या शाळांमध्ये प्रवेश देता आला नाही. अनेकांची डोनेशन देण्याची तयारी असूनही पसंतीच्या शाळांमधील प्रवेश आधीच पूर्ण झाले असल्याने हिरमोड झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

Election Commission of India : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीदरम्यान निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; मतदारयादी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

वयाच्या ६० व्या वर्षीही मिलिंद सोमण अनवाणी धावतात! पायांच्या स्नायूंना होतात 'हे' फायदे; पण ही काळजी घ्या

सायन रुग्णालयात डॉक्टरने जीवन संपवलं; स्वत:लाच सलाईन लावत ॲनस्थेशियाचा ओव्हरडोस घेतला, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News : सीजेपी आंदोलकांची पुण्यात धरपकड

SCROLL FOR NEXT