Work From Home esakal
एज्युकेशन जॉब्स

'वर्क फ्रॉम होम' असलेल्या नोकऱ्यांकडे लोकांचा कल; कोरोनाने बदलली सवय

सकाळ डिजिटल टीम

नोकरी शोधणारे कायमस्वरुपी वर्क फ्रॉम होम असलेल्या कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी प्राधान्य देत आहेत.

गेल्या अडीच वर्षांपासून जगभरात कोरोनाचं संकट आहे. यामुळे अनेक बड्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची सुविधा दिली आहे. आता एका रिपोर्टमधून अशी माहिती समोर आली आहे की, आता नोकरी शोधणारे कायमस्वरुपी वर्क फ्रॉम होम असलेल्या कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी प्राधान्य देत आहेत.

गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून आतापर्यंत कायमस्वरुपी आणि तात्पुरत्या अशा जवळपास ९३ हजार नोकऱ्या उपलब्ध असल्याचं नोकरी डॉट कॉमने म्हटलं होतं. यातील केवळ २२ टक्के नोकऱ्या या कायमस्वरुपी वर्क फ्रॉम होम होत्या. गेल्या सहा महिन्यात नोकरी डॉट कॉमने भारतात नोकरी हवी असलेल्यांसाठी कायमस्वरुपी आणि तात्पुरत्या स्वरुपाच्या जवळपास ३२ लाख नोकऱ्या उपलब्ध असल्याचं सांगितलं होतं.

नोकरी शोधणाऱ्यांकडून एकाच वेळी ५७ टक्के लोकांनी एका वेळी कायमस्वरुपी वर्क फ्रॉम होमसाठी सर्च केलं होतं. यात सर्वाधिक ३.५ लाख पेक्षा अधिक जणांनी डिसेंबर २०२१ मध्ये ही माहिती शोधली. नोकरी डॉट कॉमचे पवन गोयल यांनी सांगितलं की, कंपन्यांकडून त्यांच्या पारंपरिक कार्यालयीन कामकाजाच्या पद्धतीत बदल करण्यास सुरुवात केली आहे.

लहान आणि मोठ्या अशा दोन्ही कंपन्यांनी तिन्ही प्रकारच्या नोकऱ्या देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये रेग्युलर जॉब्स, तात्पुरतं वर्क फ्रॉम होम आणि कायम स्वरुपी वर्क फ्रॉम होमची ऑफरचा समावेश आहे. याबाबत समोर आलेल्या आकडेवारीनुसार आयटी सॉफ्टवेअर, सॉफ्टवेअर सेवा, आयटीईएस आणि रिक्रूटमेंट क्षेत्रात सर्वाधिक वर्क फ्रॉम होमच्या नोकऱ्या दिल्या जात आहेत. तात्पुरत्या आणि कायमस्वरुपी वर्क फ्रॉम होम क्षेत्रात नोकरी देणाऱ्या कंपन्यांमध्ये अमेझॉन, टेक महिंद्रा, एचसीएल, पीडब्ल्यूसी, ट्रायजेंट, फ्लिपकार्ट, सीमेंन्स, डेलॉइट, ऑरॅकल, जेनसर, टीसीएस आणि कॅपजेमिनी यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Shortage in India : पुढील 3 महिने गॅस सिलिंडर मिळणं कठीण? छगन भुजबळ यांनी दिला धोक्याचा इशारा, पाहा काय आहे कारण?

Land Scheme: अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा! गरीबांसाठी घराचा मार्ग मोकळा; महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सतर्क, जिल्ह्यात आजपासून जमावबंदी

इराणला नवा साथिदार! अमेरिकेला धुडकावून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा; मध्यपूर्वेत युद्धाचा भडका, युद्ध आणखी तीव्र होणार?

एकतर्फी प्रेमातून आधी पाठलाग, नंतर रस्त्यात गाठलं अन्...; तरुणानं तरुणीसोबत नको ते केलं...

SCROLL FOR NEXT