admission sakal
एज्युकेशन जॉब्स

Pharmacology Admission : पालक, विद्यार्थ्यांना दिलासा! औषधनिर्माणशास्त्राच्या प्रवेशाला अखेर मुहूर्त

मागिल वर्षाप्रमाणे यंदाही औषधनिर्माणशास्त्रातील प्रवेश प्रक्रिया लांबते की काय, या चिंतेत असलेले पालक आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मागिल वर्षाप्रमाणे यंदाही औषधनिर्माणशास्त्रातील प्रवेश प्रक्रिया लांबते की काय, या चिंतेत असलेले पालक आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) वतीने मंगळवारी (ता. ११) रात्री या संबंधीचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले.

सीईटी सेलकडून जाहीर वेळापत्रकानूसार विद्यार्थ्यांना २० जुलैपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. दरम्यान, इतर अभ्यासक्रमांच्या तुलनेत फार्मसीसाठी नोंदणी करण्याचा कालावधी खूप कमी देण्यात आला आहे.

एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांत अभियांत्रिकीसह इतर पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या. पण औषधनिर्माणशास्त्र आणि आर्किटेक्चरची प्रक्रिया सुरू झाली नव्हती. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता.

विलंब होत असल्याने विविध तर्कवितर्क लढविले जात होते. विद्यार्थ्यांकडून ही प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी होत होती. अखेर सेलकडून फार्मसीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

सीईटी सेलकडून तीन फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणीवेळी सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिक मागास प्रवर्ग आदी मूळ कागदपत्रे नसल्यास संबंधित विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याबाबतची पावती द्यावी लागणार आहे. अन्यथा या विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश दिले जातील, असे सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

फार्मसी प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक -

- ऑनलाईन नोंदणी व कागदपत्रे अपलोड करणे - २० जुलै

- कागदपत्रांची पडताळणी - २१ जुलै

- तात्पुरती गुणवत्ता यादी - २३ जुलै

- हरकती नोंदविणे - २४ ते २६ जुलै

- अंतिम गुणवत्ता यादी - २८ जुलै

- पहिल्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविणे - २९ ते ३१ जुलै

- तात्पुरती निवड यादी - २ ऑगस्ट

- ऑनलाईन महाविद्यालय निश्चित करणे किंवा नाकारणे - ३ ते ५ ऑगस्ट

- महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चिती - ३ ते ५ ऑगस्ट

प्रवेशासाठीचे संकेतस्थळ - https://ph2023.mahacet.org/StaticPages/HomePage

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

Mumbai News: उलट्यांचा भीषण परिणाम! दोन महिने वेदना, अखेर जीवदान; आधुनिक उपचारांनी अन्ननलिकेचे छिद्र भरले

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

कर्जत, लोणावळा अलिबागमध्ये आमचे १०० पेक्षा जास्त बंगले; मराठी अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण, कसा सांभाळते बिझनेस?

SCROLL FOR NEXT