The post will appoint an agent under life insurance 
एज्युकेशन जॉब्स

रोजगाराची संधी! पोस्टात जीवन विमा अंतर्गत एजंट नेमणार!

सकाळवृत्तसेवा

पुणे : पोस्टात डाक जीवन विमा अंतर्गत एजंटांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या 31 डिसेंबरपर्यंत येथील वरिष्ठ अधीक्षक डाकघर आणि पूर्व विभागातील पुणे शहर मार्केट यार्ड येथील कार्यालयात इच्छुक एजंटांनी अर्ज करावेत. अर्जासोबत चार फोटो, बारावीची मार्कलिस्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड झेरॉक्‍ससह येथील कार्यालयात इच्छुकांनी सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच या कार्यालयीन कालावधीत अर्ज जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 60 वर्षे यादरम्यान असावी. उमेदवार मान्यता प्राप्त संस्थामधून दहावी, बारावी उत्तीर्ण असावा. विमा क्षेत्रातील माहिती, कुशलता असणे आवश्‍यक राहील. बेरोजगार, स्वयंरोजगार व्यक्ती, माजी जीवन विमा सल्लागार, कोणत्याही विमा कंपनीचे माजी अभिकर्ता, माजी सैनिक, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, निवृत्त शिक्षक, स्वयंसहायता बचत गटाचे पदाधिकारी, टपाल जीवन विमा एजंट यासाठी पात्र राहतील. नियुक्त उमेदवारांना अतिरिक्त प्रशिक्षण देण्यात येईल. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 

मुलाखतीस येताना शैक्षणिक प्रमाणपत्रासह पॅन कार्ड, आधार कार्ड आणि इतर संबंधित दस्ताऐवजांसमवेत उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी वरिष्ठ विकास अधिकारी जे.सी. संकपाळ 9850035608 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ अधीक्षक डाक घर (पूर्व विभाग) यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway traffic update: सुट्टीचा प्लॅन बिघडला! विकेंडच्या सुरुवातीलाच मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

Thane News: ३०० झाडांची बेकायदा कत्तल! सर्वोच्च न्यायालयाचे नियम धाब्यावर

सगळ्यात कमी वयाची नायिका पडतेय सगळ्यांवर भारी; 'कमळी'ची TRPमध्ये मोठी उडी; जुई गडकरीचं स्थान धोक्यात

Maharashtra Land Revenue Code amendment : महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये एन. ए. परवानगीबाबत सुधारणा, कोल्हापूरला होणार मोठा फायदा

पुण्यात मोठी दुर्घटना टळली, 50 प्रवासी असलेल्या PMPML बसने अचानक घेतला पेट, नंतर काय घडलं?

SCROLL FOR NEXT