एज्युकेशन जॉब्स

कमी गुंतवणुकीचा दमदार बिझनेस, अधिक जाणून घेऊयात...

शिल्पा गुजर

कमी पैसे गुंतवून व्यवसाय सुरू करायचा असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी आणखी एक बिझनेस आयडीया घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्ही फक्त 20,000 रुपये खर्च करून महिन्याला लाखो रुपये कमवू शकता. आम्ही तुम्हाला लेमन ग्रास शेतीबद्दल (Lemon Grass Farming) सांगत आहोत. लेमनग्रासच्या व्यवसायाबाबत पीएम मोदींनी मन की बातमध्येही उल्लेख केला होता. लेमन ग्रासची लागवड करून शेतकरी केवळ आर्थिकदृष्ट्या मजबूत होत नाहीत तर देशाच्या प्रगतीमध्येही योगदान देत असल्याचे त्यांनी म्हटले.

लेमन ग्रासला मोठी मागणी

लेमन ग्रासपासून काढलेल्या तेलाला बाजारात मोठी मागणी आहे. लेमन ग्रासपासून काढलेले तेल सौंदर्यप्रसाधने, साबण, तेल आणि औषधे बनवणाऱ्या कंपन्या वापरतात. त्यामुळे बाजारात चांगली किंमत मिळते. या लागवडीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुष्काळग्रस्त भागातही याची लागवड करता येते. लेमनग्रासच्या लागवडीतून केवळ एक हेक्‍टरमधून तुम्ही एका वर्षात 4 लाख रुपयांपर्यंत नफा कमवू शकता.

लेमन ग्रासची लागवड कधी करायची ?

लेमन ग्रास लागवडीचा सर्वोत्तम काळ फेब्रुवारी ते जुलै दरम्यान असतो. एकदा लागवड केल्यावर सहा ते सात वेळा कापणी केली जाते. कापणी वर्षातून तीन ते चार वेळा केली जाते. लेमन ग्रासपासून तेल काढले जाते. एका वर्षात एक कट्ट्यातून सुमारे 3 ते 5 लिटर तेल निघते. या तेलाची किंमत 1,000 रुपये ते 1,500 रुपये प्रति लीटर आहे. त्याची पहिली काढणी लेमन ग्रास लागवडीनंतर 3 ते 5 महिन्यांनी केली जाते. लेमनग्रास तयार आहे की नाही हे समजण्यासाठी, तो फोडून त्याचा वास घ्या, जर तुम्हाला लिंबाचा तीव्र वास आला तर समजून घ्या की हे गवत तयार आहे. लेमन ग्रास शेतीमध्ये खताची गरज नाही, तसेच वन्य प्राण्यांकडून ते नष्ट होण्याची भीती नाही. एकदा पीक पेरले की ते 5-6 वर्षे सतत चालू राहते.

किती कमाई ?

एक हेक्टरमध्ये लेमन ग्रासची लागवड केल्यास सुरुवातीला 20,000 ते 40,000 रुपये खर्च येतो. एकदा पीक लावले की ते वर्षातून 3 ते 4 वेळा काढता येते. लेमन ग्रास हे मेंथा आणि खस सारखे कुस्करले जाते. 3 ते 4 कलमांवर सुमारे 100 ते 150 लिटर तेल निघते. एका हेक्टरमधून वर्षभरात सुमारे 325 लिटर तेल निघते. तेलाची किंमत 1200-1500 रुपये प्रति लिटर आहे, म्हणजे 4 लाख ते 5 लाख रुपये आरामात कमावता येतात.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : स्मृती इरानी यांच्या विरोधात काँग्रेस नेत्याचा अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT