Society Sakal
एज्युकेशन जॉब्स

संवाद : समाज म्हणजे काय?

समाजामध्ये वेगवेगळ्या भूमिका जगत असताना आपण कोणत्या ना कोणत्या समाजसंस्थांमध्ये राहत असतो.

सकाळ वृत्तसेवा

समाजामध्ये वेगवेगळ्या भूमिका जगत असताना आपण कोणत्या ना कोणत्या समाजसंस्थांमध्ये राहत असतो.

- प्रशांत भोसले

आपण नेहमीच म्हणतो, की मनुष्य हा एक समाजशील प्राणी आहे. मग या माणसाचा ज्यावेळेस विचार करत असतो त्यावेळेस आपल्याला दिसतं की आपल्या आजूबाजूस सर्वजण वेगवेगळ्या भूमिकेमध्ये जीवन जगत असतात. या भूमिका जगत असताना प्रत्येक भूमिकेच्या ठिकाणी आपला सहसंबंध हा इतर माणसांशी येत असतो. या माणसांसोबत आपले मग काही ना काही व्यवहार होत असतात किंवा देवाण-घेवाण होत असते. अशा प्रकारच्या या आंतरक्रियांमुळे नातेसंबंध तयार होतात. मग आपण जीवन जगत असताना वेगवेगळ्या भूमिकेच्या माध्यमातून वेगवेगळे नातेसंबंध तयार करत असतो परंतु व्यक्तिशः आपण अनेक ठिकाणी राहूनही एकच असतो, त्यामुळे नातेसंबंधांचे जाळे आपल्या आजूबाजूला तयार होतात. अशा या नातेसंबंधांच्या जाळ्याला आपण ‘समाज’ असे म्हणत असतो.

समाजामध्ये वेगवेगळ्या भूमिका जगत असताना आपण कोणत्या ना कोणत्या समाजसंस्थांमध्ये राहत असतो. आता या समाजसंस्था यांचा अर्थ समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून आपण लग्नसंस्था, कुटुंबसंस्था, धर्मसंस्था इत्यादी या पद्धतीने घेऊया. मग यामध्ये आपल्याला सांगता येईल, की मित्रांच्या सोबतसुद्धा आपण राहतो; नातेवाईकांसोबतसुद्धा आपण राहतो, या सर्व ठिकाणी आपल्या भूमिका बदलत असतात. आता या भूमिकांची सकारात्मकता आणि नकारात्मकता ही आपण त्या भूमिकेत राहत असताना तेथील नियमांना कशा पद्धतीने अंगीकारतो आहोत आणि कृतीत उतरवत आहोत यावर अवलंबून असते.

उदाहरणार्थ, समजा एखाद्या कुटुंबामध्ये एखादी मुलगा/गी आपल्या आई-वडिलांसोबत राहतो/ते आहे आणि तो/ती आई वडिलांनी घरात घालून दिलेले सर्व नियम व्यवस्थित पाळतो/ते आहे. जसे, वेळच्या वेळी घरी येणे, वेळच्या वेळी सकाळी लवकर उठणे, अभ्यास करणे, पेहराव करणे आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत कुटुंबाने घालून दिलेल्या निवडींचेच अंगीकार करणे इत्यादी. तर या प्रकारची व्यक्ती ही कुटुंबामध्ये एक चांगली म्हणजे आदर्श व्यक्ती- मुलगा/गी ठरत असते. मात्र, ज्यावेळी ही व्यक्ती आपल्या कुटुंबातील घालून दिलेल्या नियमांच्या विरोधात वागायला लागते त्यावेळेस त्या कुटुंबाकरीता त्या व्यक्तीचे वागणे किंवा वर्तणूक ही प्रश्नार्थक होत असते.

वैयक्तिक प्रश्न आणि सामाजिक प्रश्न म्हणजे काय?

ज्यावेळी एखाद्या व्यक्ती गट किंवा कुटुंबामध्ये प्रश्न निर्माण होतो आणि तो त्यांच्या पुरताच मर्यादित असतो तेव्हा त्या प्रश्नाचे स्वरूप हे वैयक्तिक स्वरूपाचे असते. मात्र, अशा वैयक्तिक स्वरूपाचे प्रश्न ज्यावेळेस समाजात बऱ्याच ठिकाणी दिसतात आणि समाजातील बहुसंख्य लोकांना असे वाटते, की हा प्रश्न एका व्यक्ती किंवा कुटुंबापुरता मर्यादित नसून तो पूर्ण समाजाला बाधित करणारा आहेस त्यावेळेस त्या प्रश्नाला सामाजिक प्रश्न असे आपण म्हणत असतो.

समाजकार्य म्हणजे काय?

वरील सर्व विवेचनावरून आपल्याला समजलेले आहे की समाज आणि समाजातील प्रश्न हे आपल्याला आजूबाजूला किंवा स्वतःही दररोजच्या जगण्यात अनुभवता येत असतात. मग आपल्यातील बऱ्याच लोकांना असं वाटत असतं, की आपण काहीतरी केलं पाहिजे या सामाजिक प्रश्नांची उकल आपण नेमकेपणाने केली पाहिजे. यातूनच आपण सामाजिक बदल आणून काहीतरी समाजाचं देणं पूर्ण करू शकतो, असे वाटणाऱ्या सर्व युवा आणि इतर व्यक्तींसाठी समाजकार्य ही एक करिअर करण्यासाठीची व्यावसायिक संधी आहे.

समाजकार्य म्हणजे सामाजिक समस्यांवर व्यक्ती गट आणि समुदाय यांना वैज्ञानिक आणि कलात्मक दृष्टिकोनातून मदत करून सक्षम केले जाते आणि त्यांच्याकडूनच समस्या सोडवली जाते. समाजकार्याच्या शिक्षणामधून आपण आपला सामाजिक बदल करण्याचा निर्धार पूर्ण तर करू शकतोच; परंतु त्याला व्यावसायिक जोड दिल्यामुळे आपल्याला सरकारी, गैरसरकारी, खासगी तसेच औद्योगिक क्षेत्रातसुद्धा काम करण्याच्या संधी आहेत. त्याची पुढील भागात माहिती घेऊयात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: भूसंपादनासाठी आठवडाभरात अधिसूचना; शक्तिपीठ महामार्ग, प्रत्यक्ष भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार, शेतकऱ्यांचा विरोध कायम

Latest Marathi News Live Update : अनुदानित खतांची विक्री आजपासून बंद

Jalgaon farmer: बापाची हृदयद्रावक धडपड! शेती वाचवण्यासाठी दोन मुलांना औताला जुंपून पाडल्या सरी, जळगाव जिल्ह्यात कुटुंबाची पोटासाठी धडपड..

Mahua Barfi : घरच्या घरी कशी बनवायची हमीरपूर स्टाईल 'महुआ बर्फी'? पाहा साहित्य आणि बनवण्याची संपूर्ण सोपी विधी!

El Nino 2026 : चिंता वाढली! प्रशांत महासागरात ‘एल निनो’ सक्रिय; पावसावर आणि शेतीवर होणार मोठा परिणाम

SCROLL FOR NEXT