Education Sakal
एज्युकेशन जॉब्स

परदेशी शिकताना : पंखांना बळ संधीचे

भारताचा इतिहास रंजक आहे. एक काळ असा होता की, शिक्षण ही गोष्ट काही ठराविक आणि मूठभर लोकांसाठीच उपलब्ध होती.

सकाळ वृत्तसेवा

भारताचा इतिहास रंजक आहे. एक काळ असा होता की, शिक्षण ही गोष्ट काही ठराविक आणि मूठभर लोकांसाठीच उपलब्ध होती.

- ॲड. प्रवीण निकम

भारताचा इतिहास रंजक आहे. एक काळ असा होता की, शिक्षण ही गोष्ट काही ठराविक आणि मूठभर लोकांसाठीच उपलब्ध होती. त्याकाळी सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, फातिमा शेख याच बरोबर छत्रपती शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्या महामानवांनी वंचित-बहुजन घटकांतील लोकांसाठी शिक्षण उपलब्ध व्हावे आणि सर्व स्तरातील लोकांना शिक्षणाचे हक्क मिळावे यासाठी आयुष्य वेचले. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये युवकांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी धडपड सुरू होती, त्या काळात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भारतामध्ये, बहुजन मुलांसाठी शैक्षणिक संधी उपलब्ध होण्यासाठी रयत शिक्षण संस्था उभारली.

रयत शिक्षण संस्था ही नुसती शैक्षणिक संस्था नाही, तर नेतृत्व, कौशल्य निर्माण करणारे विद्यापीठच आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणेने असंख्य शिक्षण संस्था केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतात उभ्या राहिल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी फार मोठी होती, ज्या काळात शिक्षणाचे हक्क मिळणे कठीण होते, अशा काळात बाबासाहेब नुसते भारतातच शिकले नाहीत तर, त्याही पुढे जाऊन त्यांनी परदेशात आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि जगाला हेवा वाटावा असा आदर्श विद्यार्थी म्हणून एक वेगळा ठसा उमटवला.

प्रत्येकाला आज शिक्षणाचं महत्त्व समजलेलं आहे, आता आपल्या युवकांना दर्जेदार शिक्षणाची ओढ लागली आहे. मला वाटत की ही ओढ लागावी हेच आपल्या महामानवांच स्वप्न होते. भारताची शिक्षण व्यवस्था बदलत आहे, परंतु आपण अजूनही त्या बदलाच्या प्रक्रियेतून जात आहोत. अशा वेळेस दर्जेदार शिक्षण देणाऱ्या परदेशी विद्यापीठांकडे आपल्या मुलांची नजर जाणे यात नक्कीच काही वावगं नाही. सध्या घेत असलेलं शिक्षण, सध्या करीत असलेलं काम आणि आपल्या भविष्यातील योजनांमध्ये परदेशी एखाद्या विद्यापीठातील कोर्स आपले ध्येय गाठण्यासाठी योग्य वाटत असेल तर नक्कीच आपण परदेशी शिक्षणाचा विचार केला पाहिजे.

मित्रांनो, आज अचानक शिक्षण त्यातही दर्जेदार आणि परदेशी शिक्षण असा काही लेख तुमच्या वाचनात येतो आहे, तर आता पुढील वर्षभर या सदरातून आपण जीवनाच्या कोणत्या टप्प्यांवर परदेशी शिक्षणाचा विचार करावा, आपण सर्व सामान्य घरातील आहोत, नक्कीच या शिक्षणासाठी लागणारा भरमसाट पैसा नसताना, विविध शिष्यवृत्तीच्या माध्यमातून परदेशी शिक्षण कसे पूर्ण करता येईल, भविष्यातील नोकरीच्या संधी पाहता कोणते महत्त्वाचे कोर्सेस परदेशी शिक्षणासाठी उपलब्ध आहेत. अशा परदेशी शिक्षणाविषयीची सर्व बाजू समजून घेणार आहोत.

(लेखकांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून चिविनिंग शिष्यवृत्तीवर पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून ‘समता सेंटर’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT