teachers Sakal
एज्युकेशन जॉब्स

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होणार ऑनलाईन

जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठीचे मोबाईल ॲपचे काम आता पूर्ण झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठीचे मोबाईल ॲपचे काम आता पूर्ण झाले आहे.

पुणे - जिल्हा परिषद शाळांमधील (ZP School) प्राथमिक शिक्षकांच्या (Primary Teacher) बदल्यांसाठीचे (Transfer) मोबाईल ॲपचे (Mobile App) काम (Work) आता पूर्ण झाले आहे. या ॲपच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षकांच्या यंदा ऑनलाईन बदल्या (Online Transfer) केल्या जाणार आहेत. शिक्षकांच्या नवीन बदली धोरणानुसार होणाऱ्या या पहिल्याच बदल्या असणार आहेत. ॲप पूर्ण झाले पण आता या बदल्यांच्या प्रक्रिया आदेशाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. राज्य सरकारच्या बदली आदेश येईपर्यंत बदल्यांची प्रक्रिया सुरु होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

आतापर्यंत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या या २७ फेब्रुवारी २०१७ रोजीच्या बदली धोरणानुसार केल्या जात असत. या बदली धोरणांत अनेक त्रुटी असल्याचा मुद्दा शिक्षकांनी उपस्थित केला होता. या बदली धोरणांमुळे शिक्षकांची गैरसोय होत असल्याने, हे धोरण बदलून नवीन धोरण अमलात आणावे, अशी मागणी राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी राज्य सरकारकडे केले होते. शिवाय यासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले होते. यानंतर ग्रामविकास विभागाने एप्रिल २०२१ मध्ये २०१७ चे शिक्षक बदली धोरण रद्द करून नवीन बदली धोरण निश्‍चित करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पाच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा अभ्यासगट स्थापन केला होता.

या अभ्‍यासगटाने सादर केलेल्या अहवालातील शिफारशीनुसार ग्रामविकास विभागाने गेल्यावर्षी नवीन बदली धोरण जाहीर केले होते. या धोरणानुसार शिक्षकांच्या बदल्यांसाठी खास मोबाईल ॲप विकसित करण्याचे काम सरकारने सुरु केले होते. या ॲपचे काम आता पूर्ण झाले आहे. या ॲपद्वारे केल्या जाणाऱ्या बदल्यांमध्ये काही त्रुटी राहू नयेत आणि या त्रुटीच्या आधारे बदलीनंतर उच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या आव्हान याचिका टाळण्यासाठी या ॲपमधील मसुद्याची फेरतपासणी करण्यासाठी सरकारने ३४ जिल्हा परिषदांमधील मिळून १०२ जणांची तपासणी समिती स्थापन केली होती. या समितीचे कामही पूर्ण झाले आहे. शिक्षक बदल्यांसाठीचे हे ॲप मोबाईल आणि संगणक अशा दोन्ही ठिकाणी वापरता येणार आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षकांना घरबसल्या ऑनलाइन बदली आदेश मिळू शकणार आहेत.

आठवडाभरात बदली प्रक्रिया आदेश?

या ॲपच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्या केल्या जाणार आहेत. यामुळे शिक्षकांना घरबसल्या बदली आदेश मिळू शकणार आहेत. मात्र ही बदली प्रक्रिया सुरु करण्याबाबतचा आदेश जिल्हा परिषदेला अद्याप प्राप्त झालेला नाही. हा आदेश येत्या आठवडाभरात प्राप्त होण्याची शक्यता जिल्हा शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT