Tata Crucible Campus Quiz 2022 google
एज्युकेशन जॉब्स

प्रिथम उपाध्या याला टाटा क्रूसिबल कॅम्पस क्विझ २०२२च्या क्लस्टर १० अंतिम फेरीचे विजेतेपद

विजेत्याला ३५,००० रुपयांचे रोख बक्षीस मिळाले आणि आता राष्ट्रीय अंतिम फेरीसाठी पात्र होण्यासाठी प्रादेशिक पातळीवरील अंतिम फेरीत त्याची स्पर्धा होईल.

नमिता धुरी

मुंबई : शैलेश जे मेहता स्कूल ऑफ मॅनेजमेंट, आयआयटी मुंबई येथील प्रिथम उपाध्या याने टाटा क्रूसिबल कॅम्पस क्विझ २०२२च्या क्लस्टर १० अंतिम फेरीचे विजेतेपद पटकावले आहे.

महाराष्ट्र १ विभागाचे प्रतिनिधित्व करणारी क्लस्टर १० फायनल्स ही एक रोमांचकारी स्पर्धा होती. त्यामध्ये सहभागींनी त्यांचे विचार आणि तीक्ष्ण प्रश्नमंजुषा क्षमता दाखवून दिली.

विजेत्याला ३५,००० रुपयांचे रोख बक्षीस मिळाले आणि आता राष्ट्रीय अंतिम फेरीसाठी पात्र होण्यासाठी प्रादेशिक पातळीवरील अंतिम फेरीत त्याची स्पर्धा होईल. एनआयटीआयई मुंबई कॉलेज मधील दर्शन पांडुरंग डांगे याला १८,००० रुपये रोख किंमतीचे बक्षीस देत उपविजेता घोषित करण्यात आले. टाटा कॅपिटल लिमिटेड, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजीव सबरवाल हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे होते आणि व्हर्च्युअल बक्षीस वितरण समारंभात त्यांनी पुरस्कार वितरण केले.

करोनामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देताना टाटा क्रूसिबल क्विझ २०२० पासून ऑनलाइन स्वरूपात पार पडली. कॅम्पस क्विझच्या ऑनलाइन आवृत्तीसाठी देश पातळीवर २४ क्लस्टर्समध्ये विभागणी करण्यात आली आहे आणि ऑनलाइन प्रिलिम्सच्या दोन स्तरांनंतर प्रत्येक क्लस्टरमधून आघाडीवरील १२ अंतिम स्पर्धकांना वाईल्ड कार्ड फायनल्ससाठी आमंत्रित केले जाईल. त्यापैकी आघाडीवरील ६ अंतिम स्पर्धक नंतर २४ ऑनलाइन क्लस्टर फायनल मध्ये स्पर्धा करतील. या २४ क्लस्टर्सचे पुढे चार झोन- दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि उत्तर असे गट केले गेले आहेत आणि प्रत्येक झोनमध्ये ६ क्लस्टर्स असतील.

प्रत्येक क्लस्टर फायनलमधील विजेता नंतर विभागीय अंतिम फेरीसाठी पात्र होईल. चार विभागीय अंतिम फेरीतील विजेते थेट राष्ट्रीय अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. चार विभागीय अंतिम फेरीतील उपविजेते वाइल्ड कार्ड फायनलमध्ये भाग घेतील आणि ४ पैकी २ उपविजेते नंतर राष्ट्रीय अंतिम फेरीसाठी पात्र होतील. एकूण ६ फायनलिस्ट नॅशनल फायनलमध्ये भाग घेतील आणि सर्वाधिक गुण मिळविणाऱ्याला नॅशनल चॅम्पियन म्हणून मुकुट घातला जाईल आणि. प्रतिष्ठेच्या टाटा क्रूसिबल ट्रॉफीसह २.५ लाख रुपयांचे भव्य बक्षीस मिळेल.

टाटा क्रूसिबल फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन आणि यूट्यूब चॅनेलवर सर्व फायनल दाखवल्या जात आहेत. आपल्या कुशल, अद्वितीय आणि विनोदी शैलीसाठी ओळखले जाणारे प्रख्यात क्विझमास्टर 'पिकब्रेन' गिरी बालसुब्रमण्यम हे या क्विझचे सूत्रसंचालक आहेत. टाटा मोटर्स, टाटा प्ले, मिया बाय तनिष्क, टाटा १ एमजी आणि टाटा सीएलआयक्यू हे या आवृत्तीचे सह-प्रायोजक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT