MHT CET Exam esakal
एज्युकेशन जॉब्स

CET Cell : ‘सीईटी कक्षा’च्या धोरणाचा खासगी विद्यापीठांना फायदा

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) माध्यमातून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश पूर्व परीक्षांचे निकाल जाहीर झाले.

सम्राट कदम

पुणे - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) माध्यमातून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश पूर्व परीक्षांचे निकाल जाहीर झाले.

मात्र अद्याप ही या अभ्यासक्रमांचे वेळापत्रक प्रसिद्ध करून प्रवेश प्रक्रिया सुरू केली नाही. याचा थेट फायदा खासगी विद्यापीठांना होत असून, शासकीय व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना जाणीवपूर्वक विलंब केल्याचा आरोप आता संस्थाचालक आणि प्राचार्य करत आहे.

सीईटी सेलच्या माध्यमातून व्यवस्थापन, अभियांत्रिकी, औषधनिर्माण, आर्किटेक्चर, ॲग्रिकल्चर अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. तर राज्यातील खासगी विद्यापीठांमधील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रिमिनेंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन (पेरा) ही प्रवेश पूर्व परीक्षा घेतली जाते.

मागील वर्षी ‘एमबीए सीईटी’चा निकाल जाहीर झाला त्यानंतर सुमारे एक महिन्याने एमबीए अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. तत्पूर्वी अनेक विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश खासगी विद्यापीठांमध्ये निश्चित केला होता.

सीईटी सेलच्या माध्यमातून व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास सातत्याने विलंब होत असल्याचे दिसून येत आहे. एमएच-सीईटी परीक्षेचा निकाल १२ जून रोजी जाहीर झाला.

परंतु, अद्याप प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले नाही. त्यामुळे इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर ॲग्री आदी अभ्यासक्रमास प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना इतर पारंपारिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन ठेवावा लागत आहेत.

संस्थाचालकांचे आक्षेप...

१) राज्य शासनाची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच खासगी विद्यापीठांची दुसऱ्या सीईटीची प्रवेश प्रक्रिया सुद्धा पूर्ण होईल. परिणामी आपोआपच शासनातर्फे उशिरा राबविल्या जाणाऱ्या प्रवेश प्रक्रियेतून विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांना कमी विद्यार्थी मिळतील.

२) सीईटी सेलच्या या उदासीन भूमिकेमुळे राज्यातील अनेक विनाअनुदानित महाविद्यालय विद्यार्थी मिळत नसल्याने बंद पडली आहेत. तर काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

३) अनेक विद्यार्थी शासकीय व खासगी अशा दोन्ही सीईटी परीक्षा देतात.परंतु, खासगी विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू होत असल्याने अनेक विद्यार्थी खासगी विद्यापीठांमध्येच प्रवेश घेतात. परिणामी शासनाकडून मिळणाऱ्या योजनांचा या विद्यार्थ्यांना लाभ मिळत नाही. तसेच शासकीय महाविद्यालयातील अभ्यासक्रमांच्या शुल्का पेक्षा खासगी विद्यापीठांचे शुल्क सुमारे पाचपट जास्त असते.विद्यार्थी व पालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.

डीटीई पोर्टलवर अभियांत्रिकी आणि बी.टेक. प्रवेशासाठीच्या संस्था अजूनही अपडेट केल्या जात आहे. दुसरं म्हणजे एमबीए. बीएड, एलएलबी, आदी वर्षांच्या अभ्यासक्रमांसाठी पदवीचे निकाल आवश्यक आहे. कॅप पोर्टलवर नोंदणी केल्याशिवाय प्रवेश सुरू होऊ शकत नाही.

- सीईटी कक्ष

दरवर्षी सीईटी कक्षाकडून प्रवेशाला उशीर होतो. प्रवेश अर्जाचा भाग एक आणि गुणवत्ता यागीसाठी कोणतीच तांत्रिक अडचण नाही. सीईटी कक्ष सांगत असलेल्या अडचणीसाठी फक्त प्रवेशाच्या दुसऱ्या टप्प्यात महाविद्यालय निवडताना अडचण येते. तो पर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू करायला कोणतीच अडचण नाही.

- रामदास झोळ, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट ऑफ अनएडेड इन्स्टिट्यूट इन रूरल एरिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar Airport: पुरंदर विमानतळाच्या जागेला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा धक्का; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

Election Commission: आयुक्तांच्या नियुक्तीबाबत दोन प्रवाह; सर्वोच्च न्यायालयामध्ये कायदेशीर काथ्याकूट

Maharashtra Drought: दुष्काळ आढाव्याला आचारसंहितेचा फटका; कृषिमंत्र्यांच्या पुणे आणि नागपूर विभागाच्या नियोजित बैठका रद्द

Latest Marathi News Live Update : युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवलेंसह ३३ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे

Greater Noida Bus Fire : यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू , जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी टाकल्या उड्या

SCROLL FOR NEXT