Chandrakant Patil esakal
एज्युकेशन जॉब्स

खासगी महाविद्यालयांनी शुल्क कमी करा, आम्ही प्राध्यापकांचे पगार देतो - चंद्रकांत पाटील

खासगी संस्थांमार्फत घेण्यात येणाऱ्या भरमसाट शुल्कामुळे शिक्षण महागले आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण हे काही जणांसाठीच मर्यादित राहत आहे.

सकाळ वृत्तसेवा

खासगी संस्थांमार्फत घेण्यात येणाऱ्या भरमसाट शुल्कामुळे शिक्षण महागले आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण हे काही जणांसाठीच मर्यादित राहत आहे.

पुणे - खासगी संस्थांमार्फत घेण्यात येणाऱ्या भरमसाट शुल्कामुळे शिक्षण महागले आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण हे काही जणांसाठीच मर्यादित राहत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण सगळ्यांपर्यत पोचविण्यासाठी शिक्षण स्वस्त होणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकार खासगी महाविद्यालये, संस्थांमधील प्राध्यापकांच्या वेतनाची जबाबदारी घेईल, महाविद्यालयांनी शुल्क कमी करावे,’ अशी भूमिका राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी मांडली.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयांमधील विविध शैक्षणिक उपक्रमांच्या डिजिटल पद्धतीचे उद्‌घाटन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष विघ्नहरी महाराज देव, कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, कार्यवाह डॉ. शामंकात देशमुख, सहकार्यवाह डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, सुरेश तोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘उच्च शिक्षणात १२ हजार कोटी रुपये हे केवळ प्राध्यापकांच्या पगारावर खर्च होतात. खासगी महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या वेतनासाठी त्यात आणखी हजार कोटी रुपये लागतील. तेही उपलब्ध करून दिले जातील. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे शुल्क ८४ हजार रुपये आणि खासगी महाविद्यालयाचे शुल्क २२ लाख रुपये आहे. या शुल्कातून प्राध्यापकांचे वेतन करत असल्याचे खासगी महाविद्यालयांकडून सांगण्यात येते.’ आता शुल्क नियमन प्राधिकरणाने शुल्क मान्य केलेल्या महाविद्यालयांपैकी १० टक्के महाविद्यालयांना भेटी देऊन प्रत्यक्ष खर्चाची पाहणी करणार असल्याचेही पाटील यांनी अधोरेखित करत शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या भ्रष्टाचारावर ताशेरे ओढले.

महाविकास आघाडी सरकारने विद्यापीठ कायद्यात केलेले बदल आम्हाला मान्य नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने तो कायदा परत मागविला आहे. या बदलांना राज्य सरकारने मान्यता दिलेली नसल्याचेही पाटील यांनी सांगितले.

१०० महाविद्यालयांमध्ये राबविणार ‘कॉम्बो अभ्यासक्रम’

‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील शंभर महाविद्यालयांमध्ये ‘कॉम्बो अभ्यासक्रम’ राबवण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांना संबंधित करियरच्या अनुषंगाने ७० टक्के अभ्यासक्रम, तर ३० टक्के अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयाचा असेल. अशा पद्धतीने अभ्यासक्रम राबविणाऱ्या महाविद्यालयांना प्रोत्साहन देण्यात येईल,’ असेही पाटील यांनी नमूद केले.

मला उपरा म्हटलेल्या पुण्याचा पालकमंत्री झालो

‘शिक्षण क्षेत्रात वीस वर्षांहून अधिक काळ काम केले आणि उच्च शिक्षण मंत्री झालो. माझे वडील गिरणी कामगार होते, आता वस्त्रोद्योगमंत्री झालो. पुण्याने कोथरूड विधानसभेचे तिकीट दिले, त्यावेळी मला उपरा म्हटले, त्या पुण्याचा पालकमंत्री झालो. ‘हे बाहेरून आले, ’ असे खूप लोक बोलायचे, म्हणून काही फरक पडला नाही,’ अशी टिप्पणीही पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict End : ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर, इस्रायल, यूएई, सौदीचे मानले आभार

Chhatrapati Sambhajnagar: दिवसभर उकाडा; सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी; विजांच्या कडकडाटासह शहरभर पावसाचे आगमन

Shaktipith Highway Kolhapur : शक्तिपीठ महामार्गाचा नकाशा बदलला, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, शिरोळ, हातकणंगले वगळले

Pune Rain News: पुण्याला गारांच्या पावसाचा तडाखा; मध्यवर्ती भागासह उपनगरांत नागरिकांची तारांबळ, झाडपडीच्‍या आठ घटना!

Chhatrapati Sambhajinagar: त्याने भरले बेरंगी आयुष्यात रंग!; ऑटिझमवर मात करीत स्वराज राजपूत बनला आईचा आधार

SCROLL FOR NEXT