Merit List sakal
एज्युकेशन जॉब्स

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची तात्पुरती गुणवत्ता यादी होणार जाहीर

अभियांत्रिकी पदवी (बी.ई/बी.टेक) आणि पदव्युत्तर पदवी (मास्टर ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी) अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेतील तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होणार.

सकाळ वृत्तसेवा

अभियांत्रिकी पदवी (बी.ई/बी.टेक) आणि पदव्युत्तर पदवी (मास्टर ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी) अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेतील तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होणार.

पुणे - अभियांत्रिकी पदवी (बी.ई/बी.टेक) आणि पदव्युत्तर पदवी (मास्टर ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी) अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेतील तात्पुरती गुणवत्ता यादी शुक्रवारी (ता.७) जाहीर होणार आहे.

राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित, विद्यापीठांशी संलग्न, विद्यापीठातील विभाग आणि विनाअनुदानित महाविद्यालये यांमध्ये अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाली. पहिल्या टप्प्यात प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया घेण्यात आली. आता केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत (कॅप) तात्पुरती गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर करण्यात येत आहे. या यादीवर आक्षेप आणि हरकती नोंदविण्यासाठी शनिवार (ता.८) ते सोमवार (ता.१०) पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीसाठी येत्या बुधवारी (ता.१२) अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.

अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता ‘कॅप’अंतर्गत प्रवेशासाठी तीन नियमित फेऱ्या होणार आहेत. प्रवेश प्रक्रियेतील पहिली फेरी १२ ते २१ ऑक्टोबर, दुसरी फेरी २२ ते ३१ ऑक्टोबर आणि तिसरी फेरी १ ते ९ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. राज्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालये, संस्थांचे शैक्षणिक वर्ष एक नोव्हेंबरपासून सुरू करण्याची सूचना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे देण्यात आली आहे.

- अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : https://cetcell.mahacet.org/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT