Scholarship Sakal
एज्युकेशन जॉब्स

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर टांगती तलवार

काही महाविद्यालयांच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे पाच हजारांहून अधिक अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत.

सकाळ वृत्तसेवा

काही महाविद्यालयांच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे पाच हजारांहून अधिक अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत.

पुणे - काही महाविद्यालयांच्या (College) उदासीन धोरणामुळे (Policy) जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या (Scheduled Caste) विद्यार्थ्यांचे (Students) भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे (Scholarship Scheme) पाच हजारांहून अधिक अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. हे अर्ज लवकर निकाली न काढल्यास हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, हे अर्ज तातडीने निकाली काढावेत, अन्यथा महाविद्यालयांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा समाज कल्याण विभागाने दिला आहे.

जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ महाडीबीटी पोर्टलमार्फत देण्यात येतो. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी महाडीबीटी पोर्टल डिसेंबर २०२१ पासून सुरू करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत २०२१-२२ साठी ३९ हजार ८२६ अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. या अर्जाची छाननी करून पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे.

महाविद्यालय स्तरावर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे अद्याप ५ हजार ३८५ अर्ज प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे. हे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. परिणामी पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यास विलंब होत आहे. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती योजनेचे प्रलंबित अर्ज तत्काळ निकाली काढावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे.

महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावरील शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज तत्काळ निकाली काढावेत. अनुसूचित जातीचे विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी महाविद्यालयांची राहील. संबंधित महाविद्यालयांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

- संगीता डावखर, सहायक आयुक्त, समाज कल्याण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

Wardha : लग्नाच्या वरातीत पुतण्यानं काकासह चुलत भावाला संपवलं, आरोपी अल्पवयीन; काय घडलं?

SCROLL FOR NEXT