Pune 12th Results esakal
एज्युकेशन जॉब्स

Pune 12th Results : बारावी निकालात पुणे विभागीय मंडळ राज्यात तिसऱ्या क्रमांकावर; दोन लाख 29 हजार विद्यार्थी झाले उत्तीर्ण

विभागीय मंडळात पुणे जिल्ह्यातील ९३.२० टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) नऊ विभागीय मंडळामध्ये बारावीच्या निकालाच्या टक्केवारीत पुणे विभागीय मंडळ (Pune Divisional Board) राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुणे विभागीय मंडळातील दोन लाख ४२ हजार ८१४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यापैकी दोन लाख २९ हजार ३२९ विद्यार्थी (९४.४४ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत.

विभागीय मंडळात पुणे जिल्ह्यातील ९३.२० टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुणे विभागीय मंडळांतर्गत पुणे, नगर, सोलापूर (Solapur) जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेसाठी दोन लाख ४४ हजार ३७८ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यातील दोन लाख ४२ हजार ८१४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर १५ हजार ७९४ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, त्यातील ११ हजार २१ विद्यार्थी (६९.७७ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत.

पुणे जिल्ह्यातून एकूण एक लाख ३८ हजार ९४९ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील एक लाख ३८ हजार १५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यापैकी एक लाख २८ हजार ७६१ विद्यार्थी (९३.२० टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.२२ टक्के इतकी असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.४१ टक्के इतकी आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८१ टक्क्यांनी जास्त आहे, अशी माहिती पुणे विभागीय मंडळाच्या अध्यक्षा मंजूषा मिसकर आणि विभागीय सचिव औदुंबर उकिरडे यांनी दिली.

जिल्हानिहाय एकूण विद्यार्थ्यांच्या निकालाची आकडेवारी :

जिल्हा परीक्षा दिलेले उत्तीर्ण झालेले उत्तीर्णतेची टक्केवारी

  • पुणे : १,३८,१५२ : १,२८,७६१ : ९३.२० टक्के

  • नगर : ६३,८५७ : ५८,९६४ : ९२.३३ टक्के

  • सोलापूर : ५६,५९९ : ५२,६२५ : ९२.९७ टक्के

  • एकूण : २,५८,६०८ : २,४०,३५० : ९२.९३ टक्के

पुणे जिल्ह्यातील एकूण विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी :

तपशील : परीक्षा दिलेले : उत्तीर्ण झालेले : उत्तीर्णतेची टक्केवारी

  • विद्यार्थी : ७३,३६६ : ६७,०६६ : ९१.४१ टक्के

  • विद्यार्थिनी : ६४,७८६ : ६१,६९५ : ९५.२२ टक्के

  • एकूण : १,३८,१५२ : १,२८,७६१ : ९३.२० टक्के

शाखानिहाय निकाल :

शाखा : परीक्षा दिलेले : उत्तीर्ण झालेले : उत्तीर्णतेची टक्केवारी

  • विज्ञान : ३,४९६ : २,७४६ : ७८.५४ टक्के

  • कला : ३,३९० : २,२७३ : ६७.०५ टक्के

  • वाणिज्य : ४,००१ : २,६६२ : ६६.५३ टक्के

बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचा तपशील :

तालुका/शहर : परीक्षा दिलेले : उत्तीर्ण झालेले : उत्तीर्णतेची टक्केवारी

  • हवेली : १२,१३५ : ११,५०२ : ९४.७८ टक्के

  • पुणे शहर (पश्चिम) : २९,१९२ : २६,६४४ : ९१.२७ टक्के

  • पुणे शहर (पूर्व) : २५,७९८ : २३,७१२ : ९१.९१ टक्के

  • पिंपरी-चिंचवड : १९,८५८ : १८,८१४ : ९४.७४ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT