pune news  sakal
एज्युकेशन जॉब्स

Pune News : राज्यातील आयटीआयचे विद्यार्थी धावणार ‘रन फॉर स्किल’ स्पर्धेत

व्यवसाय आणि कौशल्य अभ्यासक्रमाच्या जागृतीसाठी स्पर्धेचे आयोजन

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे - राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) शिकणारे लाखो विद्यार्थी आता ‘कौशल्य प्रशिक्षणाचे महत्त्व’ याबाबत जागृती करण्यासाठी धावणार आहेत. होय, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने राज्यभरातील आयटीआयमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी येत्या रविवारी (ता.१७) ‘रन फॉर स्किल’ या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे.

राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली १९ जुलै २०२३ रोजी बैठक झाली. बैठकीत युवकांमध्ये कौशल्य प्रशिक्षणाचे महत्त्व वृद्धिंगत करण्यासाठी संपूर्ण राज्यात ‘रन फॉर स्किल’ संकल्पनेवर आधारित मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले.

त्यानुसार व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळातर्फे येत्या रविवारी(ता.१७) ‘रन फॉर स्किल’ ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे.

व्यवसाय आणि कौशल्य अभ्यासक्रमांची जागृती व्हावी, या उद्देशाने रविवारी सकाळी सात ते आठ या वेळेत ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. राज्यातील सर्व शासकीय आयटीआयच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून अथवा नजीकच्या ऐतिहासिक किंवा प्रसिद्ध ठिकाणापासून स्पर्धेची सुरवात करून पाच किलोमीटरपर्यंत स्पर्धा आयोजित केली आहे.

स्पर्धेमध्ये संस्थेतील सर्व मुले-मुली प्रशिक्षणार्थी भाग घेणार आहेत. तसेच स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे तीन हजार रुपये, दोन हजार रुपये आणि एक हजार रुपये यांसह सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT