Pune University Sakal
एज्युकेशन जॉब्स

पुणे विद्यापीठातील ‘डिग्री प्लस’च्या नावनोंदणीला सुरुवात

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘डिग्री प्लस’ या ऑनलाइन व्यासपीठावर विद्यार्थ्यांच्या नावनोंदणीला सुरवात झाली आहे.

मीनाक्षी गुरव

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘डिग्री प्लस’ या ऑनलाइन व्यासपीठावर विद्यार्थ्यांच्या नावनोंदणीला सुरवात झाली आहे. अभ्यासक्रमाच्या तारखा संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्या आहेत. पदवीचे शिक्षण घेत असताना पदवीबरोबरच संबंधित विषयातील अद्ययावत ज्ञान व कौशल्ये विद्यार्थ्यांना मिळावी या दृष्टिकोनातून विद्यापीठाने ‘डिग्री प्लस’ हा प्रकल्प हाती घेतला आहे.

अनेक शैक्षणिक संस्था, कंपन्या, विशेष शिक्षण देणाऱ्या संस्था अशा अनेक संस्थांबरोबर करार करत नवे अभ्यासक्रम या प्रकल्पातंर्गत सुरू केले आहेत. यामध्ये नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. यातील काही अभ्यासक्रम हे निःशुल्क आहेत तर काही अभ्यासक्रम माफक शुल्कात उपलब्ध असणार आहेत. अभ्यासक्रमांची सर्व यादी संबंधित संकेतस्थळावर दिली आहे.या प्रकल्पात ‘सेलिब्रिटी स्कूल अंतर्गत अभ्यासक्रमात ज्येष्ठ गायिका आशा भोसले, दिग्दर्शक मधुर भांडारकर, अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी असे मान्यवर त्या-त्या क्षेत्रातील धडे देणार आहेत.

नावनोंदणी कुठे कराल?

http://degreeplus.in

कोर्ससाठी कोणाला अर्ज करता येतील?

सुरवातीच्या काळात हे अभ्यासक्रम केवळ विद्यापीठ आणि विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना करता येणार आहेत.

विद्यार्थ्यांनी काय करायचे?

विद्यापीठाशी संलग्न विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर जाऊन नावनोंदणी करावी व माहिती भरावी. यामध्ये आपल्याला कोणत्या अभ्यासक्रमात रस आहे हे नमूद करावे.

‘डिग्री प्लसच्या माध्यमातून विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धीमत्ता, क्लाऊड कॉम्प्युटिंग, उत्पादन क्षेत्र, अर्थशास्त्र, माध्यम, संस्कृती अशा क्षेत्रात त्यांची ज्ञानवृध्दी करता येणार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर हे व्यासपीठ सुरू केले आहे.’

- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

‘विद्यापीठाच्या ‘डिग्री प्लस’ या ऑनलाइन व्यासपीठातून जवळपास १३० प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. या प्रकल्पातंर्गत अभ्यासक्रमांची संख्या आगामी काळात दोनशेच्या पुढे जाईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांचा लाभ घ्यावा.’’

- डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uruli Kanchan Ganeshotsav security: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक तयारी

Pune Civic Tenders: महापालिकेच्या निविदांवर आयुक्तांचा लगाम; जुन्या निविदांतून वाढीव व नवीन कामांना बंदी

Pune Negligent Driving: सोरतापवाडी फाट्यावर टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Maratha Reservation : सरकारने परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील एकटेच सहकारीसोबत मुंबईत जाणार

Pune Civic Row: स-यादीतून बाकडे, पिशव्या खरेदीला मनसेचा कडवा विरोध; महापालिका आयुक्तांकडे निवेदन

SCROLL FOR NEXT