Savitribai Phule of Pune University Sakal
एज्युकेशन जॉब्स

इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि इंडस्ट्री ४ आधारित प्रशिक्षणासाठी पुणे विद्यापीठाचा पुढाकार

आधुनिक डिजिटल फॅक्टरीमध्ये ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि इंडस्ट्री ४’ हे अविभाज्य भाग बनत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

आधुनिक डिजिटल फॅक्टरीमध्ये ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि इंडस्ट्री ४’ हे अविभाज्य भाग बनत आहेत.

पुणे - आधुनिक डिजिटल फॅक्टरीमध्ये ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि इंडस्ट्री ४’ हे अविभाज्य भाग बनत आहेत. त्यातील नवीन संधींची ओळख आणि कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आघाडीच्या उद्योगांबरोबर विविध उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यापीठ एज्युटेक फौंडेशन आणि क्लाऊड क्यू टेकनॉलॉजिज् यांच्यात नुकताच सहकार्य करार करण्यात आला.

या सामंजस्य करार प्रसंगी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, मिलिंद पंडितराव, दीपक हर्डीकर,  विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य केंद्राच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, आदित्य परांजपे आदी मान्यवर उपस्थित होते. या करारानुसार ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि इंडस्ट्री ४’ विषयांवर तीन ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये आता शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या मिळविण्यासाठी आणि नोकरी करीत असताना अत्याधुनिक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी असे वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत.

तंत्रज्ञानाची आणि आंतरविद्याशाखीय ओळख, डिजिटल फॅक्टरीमधील विविध घटकांची ओळख हा भाग शिकविला जाईल. शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ‘शॉप फ्लोअर’वर असलेली विविध कामे आणि त्यांचे डिजिटल स्वरूप, निर्मितीचा प्राधान्यक्रम याचे प्रशिक्षण दिले जाईल. उद्योगांमध्ये कार्यरत असलेल्या शॉप फ्लोअर ऑपरेटर, मॅनेजर, कॉस्ट कंट्रोलर यांच्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर हा कार्यक्षमता, परिणाम आणि प्रभाव उन्नत करण्यासाठी कसा करावा, याचे प्रशिक्षण दिले जाईल. सर्टिफाईड असोसिएट, सर्टिफाइड इंजिनिअर, सर्टिफाईड प्रोफेशनल हे तीनही अभ्यासक्रम आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे असून या प्रशिक्षणाचा वापर अगदी पुरवठादार ते ग्राहक या साखळीतील विविध तंत्रज्ञानावर आधारित रोजगाराच्या संधीचा लाभ घेण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या ज्ञान कक्षा रुंदावण्यासाठी होऊ शकणार आहे. हे अभ्यासक्रम विद्यापीठाच्या डिग्री प्लस या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT