Pune University Sakal
एज्युकेशन जॉब्स

Pune University : कमवा शिका योजनेचे मानधन वाढवा, अन्यथा तीव्र आंदोलन; अभाविप

एकीकडे विद्यापीठातील भोजनाचे दर वाढले, प्रवेश व परीक्षा फी मध्ये वाढ झाली, अनेक शुल्क वाढ झाली असता विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या कमवा व शिका योजनेच्या मानधनात मात्र कुठल्याही प्रकारची वाढ का केली नाही?

सकाळ वृत्तसेवा

एकीकडे विद्यापीठातील भोजनाचे दर वाढले, प्रवेश व परीक्षा फी मध्ये वाढ झाली, अनेक शुल्क वाढ झाली असता विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या कमवा व शिका योजनेच्या मानधनात मात्र कुठल्याही प्रकारची वाढ का केली नाही?

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून शिक्षण घेण्यासाठी लाखो विद्यार्थी दरवर्षी येत असतात. त्यामध्ये ग्रामीण भागातून येणारा होतकरू विद्यार्थी कमवा व शिका योजनेच्या माध्यमातून काम करून आपले शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. या योजनेच्या माध्यमातून अनेक मोठ्या मोठ्या व्यक्तींनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना 45 रुपये प्रति तास मानधन देण्यात येते. हे मानधन 2017 पासून देण्यात येत असून यामध्ये कुठल्याही पद्धतीची वाढ आजवर झाली नाही.

एकीकडे विद्यापीठातील भोजनाचे दर वाढले, प्रवेश व परीक्षा फी मध्ये वाढ झाली, अनेक शुल्क वाढ झाली असता विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या कमवा व शिका योजनेच्या मानधनात मात्र कुठल्याही प्रकारची वाढ का केली नाही? किंमती वाढत आहेत, त्याप्रमाणे विद्यार्थ्याना मिळणारे मानधन पण वाढायला हवे, इतक्या कमी मोबदल्यात मेस व वाढलेले शुल्क भरणे शक्यच नाही, गरीब विद्यार्थ्यांनी कुठे जायचे असा सवाल अनिल शास्त्री या विद्यार्थ्याने अभाविप पुणे विद्यापीठ उपस्थित केला.

अनेक विद्यार्थी या योजनेमध्ये काम करतात, मात्र कमी मानधनामुळे शिक्षणाच्या आवश्यक गरजा पूर्ण होत नाही, या सर्व बाबींचा विचार करून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे विद्यापीठ अध्यक्ष महादेव रंगा द्वारे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मानधनात प्रती तास १० रुपये वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे सर यांनी विद्यार्थ्यांना या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल व प्रशासन योग्य तो निर्णय घेईल असे आश्वासन दिले.

विद्यापीठाने सर्वच शुल्कामध्ये वाढ केली असता कामाच्या मानधनांमध्ये सुद्धा वाढ करणे गरजेचे आहे, जर विद्यार्थ्यांच्या मानधनात वाढ झाली नाही तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असा इशारा दिला आहे.

- महादेव रंगा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यापीठ अध्यक्ष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT